Home विदर्भ बिब्ट्याच्या हल्यात बकऱ्या चारणारा ईसम ठार

बिब्ट्याच्या हल्यात बकऱ्या चारणारा ईसम ठार

823

शेडगाव गावाजवळील घटना

ईकबाल शेख

वर्धा / समुद्रपुर :- शेडगाव येथील रहिवासी कोठेराव रामभाऊ टिपले वय ५५ वर्ष हे सकाळी ११ च्या दरम्यान बकऱ्या चारण्यासाठी शिवारात गेले असता झुडपामध्ये असलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला केला.करून ठार केले

सदर घटना शेडगाव गावाजवळील सय्यद पटेल यांच्या पडित जमीनीवर घड ३ वाजताच्या दरम्यान उघडकीस आली.
कोठेराव रामभाऊ टिपले हे टेलरींग चे व्यवसाय करायचे पण लाॅकडाऊन मुळे दुकाने बंद असल्याने यांनी पन्नास साठ बकऱ्या घेऊन चारायला जात होते. आज सुद्या नेहमी प्रमाणे ११ वाजताच्या दरम्यान बकऱ्या घेऊन गावाच्या जवळील चारत होते शेडगाव गावाच्या अर्धा कि. मी. अंतरावर सय्यद पटेल यांच्या पडित जमीनीवर बकऱ्या चारीत असतांना झुडपात असलेल्या बिबट्याने हल्ला करीत जागीच ठार केले.
तीन वाजताच्या दरम्यान वडील आले नाही म्हणून मुलगा शैलेश ने फोन वर संपर्क साघला असता वडीलाकडुन कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मुलगा शैलैश टिपले याने स्वता शिवारात वडीलाला पाहण्यासाठी निघाला त्यावेळेस गावालगत असलेल्या सागवनात बकऱ्या दिसल्या परंतु वडील दिसले नाही तेव्हा तो पुढे पाहायला निघाला असता सय्यद पटेल यांच्या पडित जमीनीवर त्याचे वडील रक्त बंबाळ अवस्थेत दिसुन आले. तेव्हा त्याने त्वरीत पोलीस स्टेशन समुद्रपुर येथे घटनेची माहिती दिली. घटनास्थळी त्वरीत ठाणेदार हेमंत चांदेवार कर्मचाऱ्यांसह घटना स्थळी दाखल झाले. परंतु प्रेताची पाहणी केली असता गळ्यावरील सदर घावे वन्य प्राण्याचे किंवा बिबट्याचे घाव आहे असे सांगितले आहे. तेव्हा वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांना माहिती दिली. घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांच्या सह क्षेत्रसहाय्यक विजय धात्रक, वनरक्षक योगेश पाटील, उमेश बावणे, यांनी येऊन पाहणी करून वरिष्ठांना माहिती दिली. सदर बिबट्या हा परीसरात असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही दिवसा अगोदर बच्चा बिबट्याचा अपघातात मृत्यू झाला होता. आजच्या घटनेमुळे सदर परीसरात बिबट्या असल्याचे निष्पन्न झाले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, ठाणेदार हेमंत चांदेवार, पोलिस उपनिरीक्षक. रामदास खोत, अपेक्षा मेश्राम, जयपाल सुर्यवंशी, विक्की म्हैस्के, चेतन पीसे, अमोल चौधरी, प्रविण काळे, प्रविण चौधरी, सुमेध आगलावे, रवी वर्मा, तलाठी रेखा घोडमारे चालक अनील जुंबडे घटनास्थळी दाखल झाले होते.

वन विभागा कडुन त्वरीत पाच लाखाची मदत
शेडगाव शिवारामद्ये वंन्यप्राण्यांच्या हल्यात इसम ठार झाल्याची माहिती समुद्रपुर वनपरिक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर यांनी उपवनसंरक्षक राकेश शेपट यांना देताच त्यानी सदर इसमास पाच लाखाचे मदत जाहीर करीत तसे पत्र पाठवून नातेवाईकांना सांगितले.