Home नांदेड नांदेड – पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहात पकडले.

नांदेड – पंधराशे रुपयांची लाच स्वीकारताना मुख्याध्यापकास रंगेहात पकडले.

687

मजहर शेख,प्रतिनिधी नांदेड

 

लाखाची पगार असलेला मुख्यध्यापक, पंधराशे रूपयात आडकला…

नांदेड/किनवट, दि : ३०:- सहस्त्रकुंड येथील शासकीय, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेचा मुख्याध्यापक नामदेव कैलवाड, हा १ हजार ५०० रुपयाची लाच घेताना लाचलुच प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला कंत्राट मजुरीचे चार महिन्याचे बिल तयार करून देण्यासाठी दोन हजार, रुपयांची मागणी केली होती. म्हणून आज रोजी लाच स्वीकारली मुख्याध्यापकावर ईस्लापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात सहस्रकुंड येथे आश्रम शाळेवर मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेला नामदेव कैलवाड ,वय ५६ वर्षे यांनी तुझे बिल काढतो म्हणून दोन हजार रुपयाची मागणी केली. असे करत शेवटी तडजोडीत अंतिम दीड हजार रुपये देण्याचे ठरले, लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेडला येऊन रितशिर लाचखोर मुख्याध्यापकाच्या विरोधात मंगळवारी दिनांक २९ जून रोजी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे लाचलुच प्रतिबंधक विभागाने प्रताळी सापळा लावला असता, दिनांक २९ रोजी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ईस्लापुर पोलीस ठाण्यात यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा कार्यवाही पोलीस अधीक्षक कल्पना बाराळकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक विजय डोंगरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुरी, संतोष शेटे, एकनाथ गंगातीर्थ, दर्शन यादव, शेख मुजीब ,यांनी कार्यवाही पार पाडली आहे.