
यवतमाळ – स्थानिक बाबाजी दाते शारीरिक शिक्षण महाविद्यालयालातील शारिरीक शिक्षण विषयाच्या संशोधन केंद्रास संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती च्या नोटिफिकेशन क्र ५९/२०२१ दि.२१/०६/२०२१ नुसार मान्यता प्रदान करण्यात आली आहे. या संशोधन केंद्रा फायदा शारिरीक शिक्षण त आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थांना, खेळाडूंना होणार आहे. स्थानिक पातळीवरच संशोधनाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने विशुद्ध विद्यालय संस्थेने शारिरीक शिक्षण महाविद्यालय च्या वतीने सं. गा. बा. अमरावती विद्यापीठ कडे प्रस्ताव पाठविल्यानंतर विद्यापीठाने प्रस्तावाला मान्यता प्रदान केली आहे. त्यामुळे सर्व खेळाडू आणि विद्यार्थी तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचारी वृंद यांनी आनंद व्यक्त केला आहे. अशी माहिती डॉ राजेंद्र क्षिरसागर, प्राचार्य, शारीरिक शिक्षण महाविद्यालय यवतमाळ यांनी दिली.










































