Home महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो – अँड. उज्ज्वल निकम…….

गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो – अँड. उज्ज्वल निकम…….

1475

सोशल मिडिया वरून

ही गोष्ट आहे १९९३ ची. जळगावमध्ये वकिली व्यवसायात नेकीने कार्यरत असल्याने वेगळी ओळख झाली होती.
मुंबईतील बॉम्बस्फोटाने देश हादरला होता.
त्या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून माझी नियुक्ती झाली आणि मी मुंबई गाठली.
मुंबईत ना कुणाच्या ओळखी ना या शहराची कसली माहिती.
मात्र ‘आपण भले आणि आपले काम भले’
या न्यायाने मी येथे आलो.
वकीलपत्र घेतले.
त्याचवेळी मला पोलीस आयुक्तांकडून सूचना आल्या की,
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भेटायला बोलावले आहे. मी त्यांच्याकडे गेलो.
बाळासाहेबांनी अधिकाराने सांगितले की, ‘‘निकम, या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला आपल्याला सोडवायचे आहे.’’
मी सांगितले, ‘‘जमणार नाही. संजय दत्तला सोडायचे तर आणखी दहा-बारा गुन्हेगारांना सोडावे लागेल.’’
तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या एका शिवसैनिकाने मला दम भरला की, ‘‘तुम्ही सरकारचे नोकर आहात. सरकार आमचे आहे आणि बाळासाहेब हेच सरकार आहेत. त्यांचा शब्द हा अंतिम असतो. तुम्हाला तसेच वागावे लागेल.’’
मी म्हणालो, ‘‘बाळासाहेब, चर्चा आपल्या दोघात ठरली होती. हा मला विचारणारा कोण?’’
त्यांनी तो त्यांचा ‘मानसपुत्र’ जयंत जाधव असल्याचे सांगितले.
‘‘हे काम माझ्याच्याने होणार नाही’’,
असे मी स्पष्टपणे सांगताच त्यांनी त्यांच्या एका
कार्यकर्त्याला ‘पंतां’ ना फोन करण्यास सांगितला.
हे ‘पंत’ कोण ? हेही माझ्या तेव्हा लक्षात आले नाही.
नंतरच्या संवादावरून कळले की राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना त्यांनी फोन लावला होता.
या खटल्याचे कामकाज माझ्याकडून काढून घेण्याच्या सूचना त्यांनी माझ्या समोरच दिल्या.
मी ‘मातोश्री’वरून बाहेर पडलो.
आल्याआल्या वायरलेसवरून सूचना मिळाल्या.
मला तडक पोलीस आयुक्तांनी बोलावले.
आमचा ताफा तिकडे गेला.
त्यांनी मला सांगितले की, ‘‘तुम्ही तुमचे सामान भरा. जळगावला जायची तयारी करा. मुख्यमंत्र्यांचे तसे आदेश आहेत.’’
मी निघण्याच्या तयारीत होतो
तोच पोलीस आयुक्तांना तेव्हाचे गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा फोन आला.
त्यांना मी ओळखतही नव्हतो. त्यांनी
सांगितले की,
‘‘उज्ज्वल निकम यांची मी सगळी माहिती काढली आहे. ते प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ वकील आहेत. कोणत्याही परिस्थितीत हे त्यांना परत जाऊ देऊ नका…’’
पोलीस आयुक्तांनी मी त्यांच्यासमोरच बसलो असल्याचे सांगितले.
त्याबरोबर मुंडे यांनी आम्हाला दोघांनाही तिकडे बोलावले.
आम्ही त्यांच्याकडे गेलो.
माझे वकीलपत्र रद्द करण्याचा निर्णय खुद्द मुख्यमंत्र्यांनीच घेतला होता.
त्यामुळे मुंडेंनी जोशींना फोन करून विचारणा केली.
हा आदेश ‘मातोश्री’चा असल्याचे त्यांना सांगण्यात आले.
‘गृहखाते तुमच्याकडे आहे. कसे ते तुम्ही ठरवा पण निकमांना जळगावला परत पाठवा’ असे जोशींनी त्यांना
सांगितले. त्याबरोबर गोपीनाथ मुंडे यांनी माझ्या देखत बाळासाहेबांना फोन केला.
ते म्हणाले,  ‘‘साहेब, उज्ज्वलची सर्व माहिती मी काढली आहे. हा प्रामाणिक माणूस आहे. गृहखात्याची प्रतिमा डागाळू नये यासाठी अशाच खमक्या आणि निःस्वार्थ वकीलाची गरज आहे.’’
बाळासाहेब त्यांना म्हणाले, ‘‘तो शरद पवारांचा माणूस आहे…’’
मुंडेंनी त्यांना ठासून सांगितले, ‘साहेब, मी यांची खात्री देतो. ते फक्त प्रामाणिकपणाची वकिली करतील. पवारांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही. गृहखाते माझ्याकडे आहे. मला काही निर्णय घ्यायचे तरी स्वातंत्र्य द्या !’’
बाळासाहेबांनी फोन आपटला. माझी आणि गोपीनाथ मुंडे यांची ही पहिलीच भेट होती.
यापूर्वी आम्ही कधी फोनवरही बोललो नव्हतो.
मात्र माझी सगळी कुंडलीच त्यांनी काढली होती. *माझ्यासाठी त्यांनी बाळासाहेबांकडे आपला शब्द टाकला. टोकाची भूमिका घेत माझी पाठराखण केली. तेव्हा खरेतर माझी आणि शरद पवार यांची ओळखही नव्हती.
तोपर्यंत त्यांच्याशी माझा कसलाही संपर्क आला नव्हता.
त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत माझ्याकडे सरकारी वकील म्हणून महत्त्वाचे खटले आले होते.
मात्र मुख्यमंत्र्याशी थेट संपर्क येण्याचे काहीच कारण नव्हते.
सुनील दत्त यांनी साकडे घातल्याने बाळासाहेब संजयची पाठराखण करत होते,
पण खटल्याचे काम सुरू झाल्यावर त्यांनी त्यात कधीही हस्तक्षेप केला नाही.
उलट त्यांना स्पष्ट शब्दात नकार दिल्याने त्यांनी मला पुन्हा भेटायला बोलवून घेतले.
माझे कौतुक केले.
आमची पुढे चांगली गट्टी जमली.
विविध विषयांवर ते मोकळेपणाने बोलायचे. त्यांच्यात
एखाद्या लहान मुलासारखा निरागसपणा होता.
माझ्या छोट्या छोट्या गोष्टींचेही त्यांना
कौतुक वाटायचे.
त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी तटस्थपणे माझी पाठराखण केली नसती तर मला मुंबई सोडावी लागली असती.
मी जळगाव सारख्या ‘गावातून’ मुंबईत गेलो होतो.
मुंबईची संस्कृती मला माहीत
नव्हती.
न्याय व्यवस्थेची पूजा बांधताना मी कधीच कोणापुढे लाचार झालो नाही.
सद्विवेक सोडला नाही.
मी फार काही वेगळे करतोय असेही मला कधी वाटले नाही.
जे केले तो माझ्या कामाचाच एक भाग आहे
. *मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी स्वतःहून पुढाकार घेतला नसता तर कदाचित आजचा उज्ज्वल निकम दिसला नसता.

⭕मुंबई बॉम्बस्फोट, गुलशनकुमार हत्या प्रकरण, प्रमोद
महाजन खून खटला, कसाबची फाशी अशा अनेक प्रकरणात सरकारी वकील म्हणून मला काम पाहता आले.
या व अशा सर्व महत्त्वाच्या प्रकरणात मी
स्वतःशी प्रामाणिक राहिलो. लोकांच्या मनात विश्वास निर्माण झाला.
मात्र मुंडे साहेबांनी त्यावेळी बाळासाहेबांना समजावून सांगितले नसते तर मी जळगावपुरताच मर्यादित राहिलो असतो.
फक्त विद्वत्ता असून चालत नाही, तर ती सिद्ध करण्याची संधी मिळावी लागते.* *गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या कार्यतत्पर, प्रामाणिक आणि तटस्थ वृत्तीच्या नेत्यामुळे ही संधी मला मिळाली.
या नेत्याचे अपघाती निधन सर्वांनाच चटका लावणारे आहे.
बिनधास्त बोलणारी एक धडधडती तोफ अकाली थंडावली आहे. मैत्रीला आणि दिल्या शब्दाला जागणारा हा नेता सामान्यांच्या हितासाठी लढला.

लोकनेत्याला विनम्र अभिवादन
ॲड. उज्वल निकम