Home महाराष्ट्र एक अनोखा लग्न सोहळा ???

एक अनोखा लग्न सोहळा ???

347

हाफिज शेख ,

ही गोष्ट आहे सामाजिक संकेत धुडकावून लावणाऱ्या एका अचाट आणि धाडसी लग्नाची! या विवाह सोहळ्यातील वधू तृतीयपंथी असून, नवरदेव एक सुशिक्षित युवक आहे. मनमाडनजीकच्या शंकराच्या मंदिरात या दोघांनी लग्नगाठ बांधली असून, यावेळी त्यांच्या परिवारातील मोजके सदस्यही उपस्थित होते.

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण अनेक लग्नसोहळे पाहिले असतील. मात्र, येथे एक लग्न सोहळा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा झाला. येथील एका तृतीयपंथीयाचे येवला तालुक्यातील मातुलठाण येथील एका तरुणाबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ‘त्या’ दोघांचा कुटुंबांच्या साक्षीने विवाह सोहळा नुकताच परिसरातील अतिप्राचीन नागेश्वर मंदिरात झाला असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झळकला. त्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, याबाबत चर्चेला जोरदार उधाण आले आहे. दरम्यान, हे नवविवाहित दाम्पत्य सध्या येवला तालुक्यातील मातुलठाण येथे असून, सोमवारी (दि. १४) त्यांचा परत मुळाचा कार्यक्रम झाल्याचीही माहिती नववधूने (!) दिली आहे. तृतीयपंथीया युवकाने विवाह करण्याची ही घटना महाराष्ट्रातील पहिलीच असावी. मनमाड परिसरातील परिचित

असणाऱ्या तृतीयपंथीयाची गेल्या दोन महिन्यांपूर्वी येवला तालुक्यातील मातुलठाण येथील एका सुशिक्षित युवकाबरोबर सोशल मीडियावर ओळख झाली व त्यातून त्यांची घट्ट मैत्री जुळली. विचार जुळले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत त्यांनी आधी कुटुंबीयांशी चर्चा केली आणि विशेष म्हणजे त्यांनीही त्यास होकार दिला. त्यानुसार नुकतीच या दोघांनी कुटुंबाच्या साक्षीने नागेश्वराच्या मंदिरात ग्नगाठ बांधली. या अचाट आणि धाडसी लग्नाची चांगलीच चर्चा रंगली आहे.