Home विदर्भ पुसद तालुक्याला पावसाने झोडपले , ग्रामीण भागात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने नदी नाले...

पुसद तालुक्याला पावसाने झोडपले , ग्रामीण भागात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले

273

यवतमाळ – पुसद तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसाने हजेरी लावली. कालपासूनच पुसद येथे ढगाळ वातावरण आहे. पुसद तालुक्यात आज पावसाने तुफानी बॅटिंग केली. ढगफुटीसारखा या तालुक्यात पाऊस त्यामळे शेतकऱयांची मात्र पुरती दाणादाण उडाली.

तालुक्यात पडलेल्या पावसाने पारडी येथील नाल्याला मोठा पूर आला. त्यामुळे पारडी ते जाम बाजार रोड हा तब्बल एक तास बंद होता. तर पुसद दिग्रस रोड वरील वाहतुकीकरिता तात्पुरता बांधण्यात आला. छोटा कच्चा पूल पाण्याने वाहून गेला .त्यामुळे पुसद दिग्रस रोडवरील वाहतूक काही वेळेसाठी खोळंबली होती . पाणी ओसरल्यावर लगेच या पुलावर भर टाकून वाहतुकीसाठी प्रयत्न सुरु केलेत. पुसद तालुक्यातील जांब बाजार, भोजला, जमशेटपूर ,शेलु खुर्द,रंभा, बोरी खुर्द काकडदाती श्रीरामपूर, पिंपळगाव परीसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. शेताचे बांध फुटून यामुळे शेकडो हेक्टर वरील जमीन खरडून गेली . यामुळे शेतकऱयांचे उन्हाळी पिकांचे आणि फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.