Home विदर्भ पुसद तालुक्यातील जमशेटपुर येथे 14 वर्षीय मुलीचा विज पडून मृत्यू

पुसद तालुक्यातील जमशेटपुर येथे 14 वर्षीय मुलीचा विज पडून मृत्यू

95
0

यवतमाळ –  पुसद तालुक्यातील जमशेटपूर येथे एका 14 वर्षीय मुलीचा वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

समीक्षा पिंटू जाधव वय 14 रा. जमशेटपुर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे. पावसाळ्याच्या तोंडावर शेतामध्ये काम करीत असताना दिनांक 9 जून च्या दुपारी एक वाजताच्या दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.सोबतच विजेचा कडकडाट देखील होता. अशावेळी समीक्षा तिच्या आई-वडिलांसोबत कापूस पिकाच्या लागवड करण्यासाठी मदत करत होती. याच दरम्यान अचानक तिच्या अंगावर वीज कोसळून पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. याबाबत समीक्षाच्या आईवडिलांनी आरडाओरड केली असता शेत शिवारातील इतर शेतकरी जमा झाले. गावकऱ्यांनी तत्यानंतर ग्रामीण पोलिस स्टेशनचे बीट जमादार दिपक रोडे यांना माहिती देण्यात आली.त्यांनी तात्काळ त्यांच्या टिम सोबत घटनास्थळ गाठले. सोबतच पुसदचे तहसीलदार अशोक गिते यांना देखील वीज पडून मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली.त्यानंतर तहसीलदार यांनी देखील घटनास्थळ गाठले व पोलिसांच्या मदतीने पंचनामा केला.त्यानंतर त्या मुलीचे शव उपजिल्हा रुग्णालयात आणले. शवविच्छेदन केल्यानंतर मुलीचे पार्थिव त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. पुसद तालुक्यात दोन दिवसांपूर्वीच लोभिवंत नगर येथे एका युवा शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यात पुसद तालुक्यात वीज पडून मृत्यू झाल्याची ही दुसरी घटना घडल्याने परिसरात शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुसदचे तहसीलदार अशोक गिते यांनी पंचनामा करून पीडित कुटुंबाच्या नातेवाईकांना शासनाकडून तात्काळ मदत मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत.

Previous articleकंधार पोलीस ठाण्याचे एएसआय आणि खाजगी माणूस अडकले एसीबीच्या जाळ्यात.
Next articleपुसद तालुक्याला पावसाने झोडपले , ग्रामीण भागात ढगफुटीसारखा पाऊस पडल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.