Home नांदेड कंधार पोलीस ठाण्याचे एएसआय आणि खाजगी माणूस अडकले एसीबीच्या जाळ्यात.

कंधार पोलीस ठाण्याचे एएसआय आणि खाजगी माणूस अडकले एसीबीच्या जाळ्यात.

246

मजहर शेख, नांदेड

नांदेड/कंधार, दि : ९ :- कंधार पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस उप निरीक्षकाला खाजगी माणसाच्या मदतीने ५ हजारांची लाच स्वीकारल्यानंतर नांदेड लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे.
एक तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ३ जून रोजी तक्रार दिली की, कंधार येथे कार्यरत सहायक पोलीस उप निरीक्षक सुभाष चोपडे आणि खाजगी माणूस शेख फारुख त्यांच्या कडे १० हजार रुपये लाचेची मागणी करीत आहेत. कारण त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाणे कंधार येथे आलेल्या अर्जानुसार त्यांच्यावर काही कार्यवाही न करण्यासाठी १० हजारांची लाच मागणी होती.ही सापळा कार्यवाही पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर, अपर पोलीस अधिक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक अरविंद इंगोले, पोलीस अंमलदार किशन चिंतोरे,एकनाथ गंगातीर्थ,जगन्नाथ अनंतवार,ईश्वर जाधव,नरेंद्र बोडके यांनी पार पाडली.