Home मराठवाडा मराठा आरक्षणासाठी मोदींना जिल्ह्यातुन ५ लाख पत्र, युवक राकाँ चे कपिल आकात...

मराठा आरक्षणासाठी मोदींना जिल्ह्यातुन ५ लाख पत्र, युवक राकाँ चे कपिल आकात यांची माहिती

702
0

जालना- लक्ष्मण बिलोरे

राष्ट्रवादी काँग्रेस २२ व्या वर्धापनदिनानिमित्त राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष महेबुब भाई शेख यांच्या आदेशानुसार, मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक कोटी पत्र पाठवण्याचा संकल्प केला आहे ,या आदेशाचे पालन करून राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष कपिल भैय्या आकात यांनी जालना जिल्ह्यातुन पाच लाख पत्र पाठवण्याचा संकल्प केला आहे .
याची सुरुवात उद्या दि १० जून रोजी परतुर येथुन होणार आहे, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पदाधिकारी यांची महत्वाची बैठक आकात यांच्या जयभवानी निवास ,जयभवानी कॉलनी येथे बोलावण्यात आली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जारी पत्रकात म्हटले आहे.

Previous articleआमदार भीमराव केराम व सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी कोलामपोडावार महत्व पटविल्याने 110 वर्षे वयाच्या भीमबाई रामा टेकाम यांनी घेतली कोविड – 19 ची लस
Next articleकंधार पोलीस ठाण्याचे एएसआय आणि खाजगी माणूस अडकले एसीबीच्या जाळ्यात.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.