
मजहर शेख, नांदेड
नांदेड/किनवट, दि : ३:- कोविड १९ कोरोना जागतीक महामारी ने देशात नसुन सर्व जगाला अक्षरशा हादरुन सोडले आहे एक सामाजीक दाईत्व म्हणुन बुलडाणा अर्बण बॅंक शाखा सारखणीच्या वतिने सिंदखेड पोलीस स्टेशन व प्राथमीक आरोग्य केंद्र सिंदखेड व दहेली तांडा येथे सर्व अधीकारी व उपस्तीत कर्मचारी यांना एन ९५ मास्कचे वाटप करण्यात आले.
बुलडाणा अर्बण बॅंकेचे अध्यक्ष मा.राधेश्यामजी चांडक (भाईजी),चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेशजी झंवर सर,बुलडाणा अर्बणचे पालक संचालक मा.सुबोधजी काकाणी सेठ,विभागीय व्यवस्थापक मा.रोशनजी अग्रवाल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलीस ठाण्याचे स.पो.नी.भालचंद्र तिडके साहेब,जयसिंग राठोड,पोलीस जमादार हाकीम पठान व सर्व उपस्तीत पोलीस कर्मचारी व प्राथमीक आरेाग्य केंद्र सिंदखेड व दहेली तांडा येथील वैद्यकीय अधीकारी डॉ.आर.एस.महाजनमॅडम,व डॉ.एस.व्ही.जाधव साहेब यांच्या हस्ते एन ९५ मास्कचे उपस्तीत कर्मचारी व लोकांना वाटप करण्यात आले,या वेळी शाखा व्यवस्थापक आर.डब्लु. शिंदे व दिनेश जाधव,सचिन मॅकलवार,निलेश ढवळे,निखील पुट्टावार,बालाजी आव्हाड,बबलु जाधव, आदी कर्मचारी आणी पञकार रशीद फाजलानी,दानीश घानीवाले,समद फाजलानी यांच्या उपस्तिीत कार्यक्रम राबवीण्यात आला.