
अखेर तीन महिन्यानंतर चोरट्यांना पकडण्यास आर्वी पोलिसांना आले यश
ईकबाल शेख.
वर्धा.
वर्धा जिल्हा आर्वी पोलीस स्टेशन येथे नरेंद्र रामकृष्ण तांबेकर वय ६२ वर्ष रा. भाईपुर आर्वी जि. वर्धा यांच्या पाचेगाव ते दहेगाव रोड वरील पाचेगाव शिवारात असलेला संस्थेचा पावरलूम प्रकल्प येथे नट-बोल्टने फिट असलेल्या ४७ इलेक्ट्रिक मोटारी प्रत्येकी किंमत ३ हजार रुपये प्रमाणे एकूण १ लाख ४१ हजार रुपयाचा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने नरेंद्र तांबेकर यांच्या तोंडी रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करून तपासात घेतला असता सदर गुन्ह्याचे तपासात असताना मुखबीर चे खात्रीशीर मिळालेल्या खबरे वरून गुन्ह्यात शेख शाहरुख शेख रफु वय १९ रा. महाराणा प्रताप वार्ड अर्वी, धरमसिंग उर्फ शिवा रतनसिंग चव्हाण वय १९ वर्षे रा कन्या शाळेसमोर झोपडपट्टी आर्वी, शेख समीर शेख नासिर वय २७ वर्ष साईनगर आर्वी, शेख अमीर शेख हनीफ वय २७ वर्ष रा. बालाजी वार्ड आर्वी, मोहम्मद आजीज मोहम्मद एजाज वय १९ वर्ष रा. विठ्ठल वार्ड आर्वी, यांना ताब्यात घेऊन गुन्ह्यातील चोरी गेलेल्या माला बाबत सखोल विचारपूस केली. असता आरोपीनी संगणमत करून गुन्हा केल्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरी केलेल्या एकूण ४७ इलेक्ट्रीक मोटारी एकूण किंमत एक लाख ४१ हजार रुपये चा माल हा आरोपी क्र. ५ यांना विकल्याचे कबूल केल्याने गुन्ह्यात चोरीला गेलेल्या मालापैकी तांब्याची तार ७० किलो किं. ७० हजार २०० रुपये नगदी १६ हजार ९०० असा गुन्ह्यातील ८७, १०० रु चा माल तसेच गुन्ह्यात वापरलेले तीन वाहनाची व इतर साहित्याची किंमत २ लाख ४० हजार १०० रु असा एकूण जुमला की ३ लाख २७ हजार २०० रु चा मल जप्त केला. सदर कार्यवाही प्रशांत होळकर पोलीस अधीक्षक सा. वर्धा उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनात गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय गायकवाड आर्वी, यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पो. उपनिरी. देवानंद केकन, गुन्हे विभागाचे पो. हवा. रंजीत जाधव अनिल वैद्य , सागर गिरी, सतीश नंदागवळी , प्रदीप दाताळकर हे करीत आहे.