Home पुणे आहो गुरुजी हे बरं नवं ???

आहो गुरुजी हे बरं नवं ???

752
0

 

शिक्षकाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या ,

समीर शेख ,

पुणे : महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यातच आता पुणे शहरातील पुणे शहरातील एका प्रसिध्द शिक्षण संस्थेत काम करणाऱ्या शिक्षिकेवर सोबत काम करणाऱ्या शिक्षकाने बलात्कार केल्याचं समोर आलं आहे. आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.आरोपी शिक्षकाने शिक्षिकेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. या आरोपी शिक्षकाला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. त्याने शिक्षिकेकडून कर्ज फेडण्यासाठी 5 लाख घेऊन फसवणूक केल्याचेही उघडकीस आले आहे.विनोद क्षीरसागर असे अटक केलेल्याचे शिक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी 35 वर्षीय शिक्षिकेने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी आणि फिर्यादी हे दोघेही शिक्षक असून एका नामांकित शिक्षण संस्थेत नोकरी करतात. आरोपी विनोदने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखविले. तिचा विश्वास संपादन करून तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. त्यानंतर तिच्याकडे 11 लाख रूपयांची मागणी करून 5 लाख रूपये बॅकेचे कर्ज फेडण्यासाठी घेऊन तिची फसवणूक केली.दरम्यान फिर्यादीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आली असून पुढील तपास कोंढवा पोलीस करीत आहेत.

Previous articleअन ,त्याच्या तावडीतून सुटका होताच त्या माय लेकींच्या चेहेऱ्यावर हसू खीळला ???
Next articleसारखणी बुलडाणा अर्बन बॅंकच्‍या वतिने मास्‍कचे वाटप.
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.