Home मराठवाडा कुंभार पिंपळगाव येथील विज पुरवठा सुरळीत करा

कुंभार पिंपळगाव येथील विज पुरवठा सुरळीत करा

373

जालना जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील विज पुरवठा समस्यांत दिवसेंदिवस वाढ होत असून यामुळे सर्व सामान्य नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

या पुर्वी ३३ के.व्ही.सबस्टेशन कुंभार पिंपळगाव परिसरास १३२ के.व्ही.सबस्टेशन परतुर येथुन विज पुरवठा होत असे,त्यानंतर घनसावंगी येथे नव्याने १३२ के.व्ही.सबस्टेशन कार्यान्वीत झाल्याने सदरील विज पुरवठा हा घनसावंगी येथुन जोडण्यात आला.विज पुरवठा हा सद्यस्थितीत सुरळीत चालू आहे.परंतु कधी काळी अवकाळी पाऊस, हवामानाचा नैसर्गिक बदलामुळे आपत्कालीन परिस्थिती उदभवल्यास जसे की सोसाट्याच्या वारा पाऊसामुळे मुख्य विज वाहिनीचे खांब पडणे त्यामुळे विज पुरवठा हा तासनतास तर कधी दोन ते तीन दिवस खंडित होत आहे. हे काम योग्य वेळेत पूर्ण न झाल्यास घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी मुख्य बाजारपेठ म्हणुन ओळख असणाऱ्या कुंभार पिंपळगाव बाजार पेठ व परिसरातील सर्वच गावांवर यांचा विपरीत परिणाम होवून जनजीवन हे विस्कळित होत आहे.त्यातच अशा परिस्थितीत दमट हवामान वातावरणात विज पुरवठा खंडित झाल्याने घरातील पंखे बंद पडल्यामुळे ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे.तसेच पिठाच्या गिरण्या पाणी बंद झाल्याने ग्रामस्थांना उपासमारीची वेळ येत आहे.तसेच गावातील रोहिञ हे सतत निकामी होवून जळत असल्याचे प्रकारात वाढ होत आहे.यांमुळे ग्रामस्थांना विविध समस्यांना सामोरं जावे लागत आहे.रोहिञ हे निकृष्ट दर्जाचे पाठवत असल्याने ते दोन ते तीन दिवसांत निकामी होवून लवकर जळत आहे याची आपण सखोल चौकशी करून संबंधित विभागांना चांगल्या दर्जाचे रोहिञ देण्याची सुचना करुन विज पुरवठा सुरळीत करुन नागरिकांना कायमचा दिलासा देण्यात यावा व कुंभार पिंपळगाव – घनसावंगी या मुख्य विज वाहिनीस बिघाड होवून खंडित झाल्यास आपत्कालीन परिस्थितीत तात्पुरता स्वरुपात १३२ के.व्ही.सबस्टेशन परतुर येथुन विज पुरवठा सुरळीत करावा.या आशयाचे निवेदन कार्यकारी अभियंता जालना, उपकार्यकारी अभियंता घनसावंगी, सहायक अभियंता कुंभार पिंपळगाव यांना येथील ग्राम विकास युवा मंच व ग्रामस्थांनी दिले आहे.यावेळी अंकुश कंटुले,उमेश बोटे, वैभव कुलकर्णी, सिद्धेश्वर कंटुले, दिनेश दाड, भागवत राऊत,केशव टेकाळे,प्रकाश बिलोरे, योगेश सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते.