
मुलाच्या वाढदिवसासाठी ड्रेस व केक देखिल पाठवला
राजेंद्र गायकवाड
राज्यमंत्री बच्चू कडू हे राज्यातील आजारी, दिव्यांग, अनाथ व शेतकऱ्यांना सदैव मदत करणारे म्हणुन सर्वपरिचित आहेत. जाफरवाडी ता. खुलताबाद येथिल श्री.योगराजसिंग झाला यांना तत्काळ मदत पोहचवुन बच्चु कडू यांना सर्वसामान्याचा असलेल्या कळवळा दिसुन आला.
जाफरवाडी ता. खुलताबाद येथे शनिवार दि. २९ मे रोजी सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस आला. या वादळी पावसात शेतमजुर श्री.योगराजसिंग झाला यांच्या कच्च्या घरावरील सर्व पत्रे उडुन गेली. दुदैवाने जिवित हानी झाली नव्हती. मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या श्री. योगराजसिंग झाला यांचा सर्व संसार उघडयावर आला. कोरोणा लॉकडाऊनमूळे हाताला काम नसतांना आलेल्या हया संकटाने ते हतबल झाले. आता घरावर पत्रे कशी टाकायची हा प्रश्न त्यांना पडला. मात्र त्यांनी बऱ्याचदा शेतकऱ्यांना व गरीबांना बच्चूभाऊ मदत करतात हे ऐकले होते. त्यांनी गावातील मित्रांच्या मदतीने वाटस अपव्दारे बच्चू भाऊ यांना मदतीची विनंती केली. वादळात पत्रे उडाली त्याच दिवशी त्यांच्या ९ वर्षाच्या अरूष या मुलाचा वाढदिवस होता. वादळ पावसात पत्रे उडून गेल्याने मुलाचा वाढदिवस या कुंटूबांला साजरा करता आला नाही.
हि सर्व वार्ता राज्यमंत्री बच्चू भाऊ यांना कळताच त्यांनी स्विय्य सहाय्यक श्री. संतोष राजगुरु यांना पाठवुन झाला कंटूबाला पत्रे पोहच केली.
तसेच ९ वर्षाच्या अरूष या मुलाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी या मुलाला नवा ड्रेस व केक पाठवुन वाढदिवसाच्या शुभेच्छा अरूषला दिल्या.
राज्यमंत्री बच्चु कडू यांनी तलाठयाकडून पंचनामा होण्यापूर्वी तत्काळ मदत पाठवल्याने गावकरी व झाला कुंटूबीयांनी बच्चू कडू यांचे आभार मानले.बच्चू कडू यांनी तलाठी यांना तत्काळ या प्रकरणी पंचनामा करून मदत करण्याची सुचना दिली.
हि मदत पोहच करण्यासाठी श्री. संतोष राजगुरू यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे वैजापुर तालुका अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर घोडके, ज्योतिसिंग छानवाल, अनिल दाणे, नागे सर, राहूल राजपुत, ऋषीकेष राठोड आदीची उपस्थिती होती.