Home मराठवाडा कोरोनाला हरवून परतलेल्या इसमाला अखेर काळाने गाठले 

कोरोनाला हरवून परतलेल्या इसमाला अखेर काळाने गाठले 

567
0

घनसावंगी-लक्ष्मण बिलोरे

जालना – महिनाभरापूर्वी कोरोना पाॅझिटीव्ह निघालेल्या इसमाने कोरोनाशी दोन हात करून कोरोना विरूद्धची लढाई जिंकली परंतु हे बहुधा नियतीला मान्य नसावे , सदाबहार व्यक्तीमत्व असलेले राजाटाकळी येथील रहिवाशी आणि मत्स्योदरी सहकारी सुतगिरणी मध्ये लिपिक पदावर कार्यरत श्रीरंग सर्जेराव आर्दड आबा यांना अखेर काळाने गाठले. रविवारी,३० मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ४९ वर्षे होते , त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक मुलगा, दोन मुली,जावयी, एक भाऊ असा मोठा परिवार आहे.स्वस्त धान्य दुकानदार आप्पासाहेब आर्दड यांचे चुलत भाऊ तर बळीराम आर्दड यांचें ते मोठे बंधू होत .त्यांच्यावर संध्याकाळी ९ वाजता गोदावरी तीरावरील स्मशानभुमीत अंतीम संस्कार करण्यात आले.

Previous articleदैनिक ‘ लोकपत्र’ वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल
Next articleलघु वृत्तपत्रांची सरकारी कार्यालयांकडून येणे असलेली जाहिरात बिले त्वरित देण्यात यावी
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.