Home मराठवाडा दैनिक ‘ लोकपत्र’ वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

दैनिक ‘ लोकपत्र’ वर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल

533

जालना – लक्ष्मण बिलोरे

औरंगाबाद शहरातील दैनिक लोकपत्र कार्यालयात बळजबरीने घुसून कार्यकारी संपादक रविंद्र तहकिक यांच्यावर प्राणघातक हल्ला करून कार्यालयाची नासधूस करण्याचा प्रयत्न करणाऱ्या हल्लेखोरांवर चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्यात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजी राजे भोसले यांना ‘ मराठा समाजाचे ठेकेदार आहात काय ?’असे म्हणणाऱ्या नितेश राणे यांच्या संदर्भात दैनिक लोकपत्र मध्ये वृतांत छापून आला होता.त्यावर आक्षेप घेत स्वत:ला नारायण राणेंचे कार्यकर्ते म्हणवणाऱ्या औरंगाबाद शहरातील गणेश उगले, निलेश भोसले, बाबुराव वाळेकर,उमेश शिंदे यांच्यावर पत्रकारिता संरक्षण अधिनियम २०१९सह भादवि कलम १४३,१४७,१४९,४४७,३२३ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या संदर्भात पुढील कार्यवाही चिकलठाणा एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अमरनाथ नागरे हे करत आहेत.या घटनेचा राज्यभरातील पत्रकार आणि पत्रकार संघटनांकडून निषेध होत असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.