Home जळगाव गफ्फार मलिक अंत यात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघी मुलांची नावे वगळा :- फारुक...

गफ्फार मलिक अंत यात्रा प्रकरणी गुन्ह्यातून तिघी मुलांची नावे वगळा :- फारुक शेख ची मागणी

389

रावेर (शरीफ शेख)

अब्दुल गफ्फार मलिक यांच्या अंत्ययात्रेत गर्दी झाल्याने सदर प्रकरणी शनिपेठ पोलिस स्टेशनला भा द वि 188 269 व आपत्ती व्यवस्थापन कलम 51 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यात गफ्फार मलिक यांचे तिची मुले अनुक्रमे एजाज मलिक. नदीम मलिक व फैसल मलिक यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे वास्तविक पाहता या तिघी मुलांनी अंत्ययात्रेत सामील होण्यासाठी कोणालाही निमंत्रण दिलेले नाही बोलवले नाही एवढेच नव्हे तर या तिघा भावंडांना कोरोना हा आजार नाही किंवा जे मृत पावले ते सुद्धा कोरोनाग्रस्त नव्हते तसेच कायद्यानुसार कुटुंबातील कोनी मेला तर त्या घरातील 20 लोकांना अधिकृत परवानगी असताना सुद्धा या तिघीही मुलांवर गुन्हा कसा दाखल करण्यात आला त्याच्यातून त्यांची नावे त्वरित वगळावे व त्यांना न्याय द्यावा अशी मागणी जळगाव मुस्लिम व कब्रस्तान ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी फारुक शेख यांनी माननीय पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांना व्हाट्सअप व ईमेल द्वारे निवेदन देऊन केलेली आहे सदर निवेदनात नुकतेच खासदार राजीव सातव यांच्यावर ज्या ठिकाणी अंत्यविधी झाला त्या कळमनुरी पोलीस स्टेशनला कुटुंबावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंद नसल्याचे समजते तसेच अस्थिविसर्जन ला सुद्धा गर्दी असून सुद्धा त्या वेळीही गुन्हा नोंद झालेलानाही असे सुद्धा नमूद केलेले आहे.