Home रायगड माथेरान नगरपालिकेत शिवसेनेला हादरा; दहा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश , माथेरान मध्ये राजकीय...

माथेरान नगरपालिकेत शिवसेनेला हादरा; दहा नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश , माथेरान मध्ये राजकीय भूकंप

312
0

माथेरान (प्रतिनिधी) – : थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या माथेरानमधील राजकीय उलथापालथीमुळं तेथील वातावरण अचानक तापलं आहे.आगामी माथेरान नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माथेरान नगरपरिषदेच्या अकार्यक्षम नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व त्याचे पती नगरसेवक प्रसाद सावंत यांच्या जुलमी व मनमानी कारभाराला कंटाळून माथेरान नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष आकाश चौधरी यांच्यासह १० नगरसेवकांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. राज्यात प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

माथेरान नगरपालिकेत एकूण १४ नगरसेवक आहेत. त्यापैकी १४ नगरसेवक शिवसेनेचे होते, त्यातील दहा जणांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या कार्यकतृत्वाला सन्मान देत, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण , आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपचे तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप मध्ये शिवसेनेच्या नगरसेवकांचे व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी भाजपमध्ये जाहिर प्रवेश केला आहे सदरचा कार्यक्रम कोल्हापुरात हा प्रवेश सोहळा पार पडला.
या पक्षांतरामुळं माथेरान नगरपालिकेत भाजप बहुमतात आला आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये आकाश चौधरी ( उपनगराध्यक्ष/ आरोग्य समिती सभापती ), राकेश चौधरी, सोनम दाभेकर, प्रतिमा घावरे, रुपाली आखाडे, सुषमा जाधव, प्रियांका कदम,ज्योती सोनावळे, संदीप कदम, चंद्रकांत जाधव यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिवसेनेच्या दहा नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचं बोललं जात आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या झालेल्या पराभवानंतर राज्यातील महाविकास आघाडीला भाजपनं हा दुसरा झटका दिला आहे. चंद्रकांत पाटील यांनी या निमित्तानं महाविकास आघाडी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. ‘झोपेत असतानाच एक दिवस हे सरकार पडेल. सरकारची झोपमोड कधीच झाली आहे,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले. ‘भाजपमध्ये प्रत्येकाचा सन्मान केला जातो. गुणवत्तेप्रमाणे संधी दिली जाते. त्यामुळं आता भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माथेरानमधील पदाधिकाऱ्यांंनाही योग्य ती संधी दिली जाईल,’ असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमाजवळ बोलताना दिली आहे.

प्रतिक्रिया
माथेरान मध्ये २५ कोटींची विकासकामे सुरू असून ती निकृष्ट दर्जाची रस्त्यांची बांधकामे होत आहे , याबाबत वेळोवेळी वृत्तपत्रातील बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या त्यानुसार कायापालट झाला. नगराध्यक्षा व तिचे पतीराज नगरपरिषदेचा हम करो सो कायदाचा वापर अन्य सेनेच्या नगरसेवकांना विश्वासात न घेता कामे करीत व स्वतः टेंडर घेऊन कारभार पाहत होते त्यामुळे सेनेच्या नगरसेवक नाराज झाले होते.आगामी नगरपरिषदेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नगराध्यक्षा यांनी आर्थिक मलिदा खाण्याच्या दृष्टिकोन ठेवून काम केले.याची कल्पना सेनेच्या वरिष्ठ नेत्यांना माहित असूनही त्यांनी दुर्लक्ष केले त्यामुळे या दहा नगरसेवकांनी सेनेला अखेरचा जय महाराष्ट्र ठोकला आहे.याआधी देखील नगरसेवक अजय सावंत यांना निवडून दिले परंतु ते जनतेची सेवा करू न शकल्यामुळे परिवर्तन घडून आणण्यासाठी प्रसाद सावंत यांना निवडून दिले त्यांनी देखील विकासकामांच्या नावाखाली बोंबाबोंब केली आणि माथेरान लुटायला घेतले असल्याचा सणसणीत आरोप केला आहे त्यामुळे माथेरान मध्ये हा मोठा राजकीय भूकंप आहे त्याचा परिणाम आगामी निवडणुकीत होईल ,  योगेश भाई सरावते ,जनहित लोकशाही पार्टी महाराष्ट्र सचिव