Home उत्तर महाराष्ट्र ताली आणि थाली आंदोलन..!

ताली आणि थाली आंदोलन..!

233

राजेंद्र गायकवाड 

अहमदनगर  –  आज मा. ना मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशानुसार आज राज्यातील प्रत्येक गाव तालुका जिल्ह्यातील चौकाचौकात टाळी आणि ठाली बजाव आंदोलन करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर ह. भ. प. अजय महाराज बारस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र राज्य चे प्रवक्ते संतोष पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर चे जिल्हा प्रमुख विनोदसिंग परदेशी यांनी धान्याची माळ गळ्यात आडकाउन केंद्र सरकारने जी कडधान्याची आयत धोरण राबविले व खतांच्या वाढलेल्या किंमती च्या निषेध करत 6.00 वाजता लक्षवेधी आणि आगळे वेगळे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.या वेळी कोरोना चे सर्व नियम पाळून आंदोलन करण्यात आले या वेळी जिल्हा सल्लागार मालोजी शिकारे व प्रहार सैनिक उपस्थित होते प्रहार रुग्ण सेविका दिपाली पाटील पण या आंदोलन साठी उपस्थित होत्या.