Home नांदेड धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न – “ब्लड फॉर महाराष्ट्र...

धर्माबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न – “ब्लड फॉर महाराष्ट्र “अभियानात अनेकांनी केले रक्तदान

81
0

राजेश एन भांगे

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरदचंद्र पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चालू केलेले अभियान ” ब्लड फॉर महाराष्ट्र” महाराष्ट्रात रक्तपुरवठ्याची कमतरता असल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी ब्लड फॉर महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक शहरात या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रक्तदान शिबिर घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

या आवाहनचा निर्देशना नुसार ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा सरचिटणीस जाभरूनकर सर, राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा उपाध्यक्ष पाडुंरग दादा गोरठेकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशसचिव बाळासाहेब भोसीकर , तहसिलदार दत्तात्रय शिंदे, ग्रामीण रुग्णालय चे अधिक्षक शेख एकबाल, डॉ लक्ष्मीनारायण केशटवाट, डॉ कांबळे, पोलिस निरीक्षक सोहम माच्छरे हे होते.
दि.१७मे सोमवार रोजी आर्यभवन धर्माबाद येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रवादीच्या रक्तदान शिबिरात ५० दात्यांनी रक्तदान केले आहे. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष नागेंद्र पाटील कदम चोळाखेकर,मा.ता.आध्यक्ष हानमंत पाटील जगदंबे पिंपळगावकर, नायगाव विधानसभा.आध्यक्ष पंडीत पाटील जाधव, माजी नगरसेवक रवींद्र शेट्टी, गटनेता तथा नगरसेवक भोजराज गोणारकर, नगरसेवक सुधाकर जाधव, नगरसेवक आबेद आली,माजी नगरसेवक समीर अहेमद सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा सरचिटणीस सुधीर येलमे, युवक शहराध्यक्ष मोसीन खान, विद्यार्थी तालुकाध्यक्ष नितेश पाटील बिजेगावे, विद्यार्थी शहराध्यक्ष किरण गजभारे, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष बाबुराव गोणारकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष जावेद सर महिला तालुकाध्यक्षा योगीता किरोळे, महिला शहराध्यक्षा सय्यद सुलताना बेगम, महिला तालुका उपाध्यक्षा आजमेरी बेगम,राहुल शिरसे महम्मद कासीब जिया खान, महम्मद मोईज,रहिम खान,हानमंत किरोळे,परनित उमरीकर,राजा ठाकुर,यांनी परिश्रम घेतले व गुरु गोविंद सिंग जी ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉ प्रसाद बोरुळकर यांनी सहकार्य केले.

उन्हाळ्यातील तापमानाची तीव्रता अधिक असतानाही अनेक तरुण युवकांनी व नागरिकांनी रक्तदान शिबिरास सहकार्य केल्याबद्दल धर्माबाद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.