Home महत्वाची बातमी फक्त तीन हजार रुपायासाठी बापाने तरुण मुलास मारून टाकले ,

फक्त तीन हजार रुपायासाठी बापाने तरुण मुलास मारून टाकले ,

799

 

 

खुनी बापास बाळापूर येथून अटक ,

अमीन शाह

शेगाव शहरातील खम्मु जमदार नगरातील एका मशिदीच्या खोलीत रविवारी पहाटे १ ९ वर्षीय युवकाचे प्रेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली . घटनेसंदर्भात मृतकाच्या आईने पोलिसांत तक्रार दिली असून बापानेच मुलाचा खुन केल्याचा संशय व्यक्त केला . तपासाअंती शहर पोलिसांनी बापाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे . शहरातील गरीब नवाज मशिदमध्ये पहाटे ५ वाजेच्या सुमारास अजान देण्याकरिता सय्यद वली सय्यद महेबुब हे गेले असता त्यांना मजिदमधील एका खोलीत एक युवक झोपलेला दिसून आला . सय्यद वली यांनी इतर दोघांच्या मदतीने त्यास उठविण्याचे प्रयत्न केले , मात्र तो मृत असल्याचे त्यांच्या लक्षात आले . मुस्तकीम शे.कासम , वय १ ९ वर्षे हा स्थानिक खम्मु जमदार नगर येथील रहिवासी असल्याचे समजले . नातेवाइकांनी घटनेची माहिती शहर पोलिसांत दिली . मृतकाची आई जैबुन्निसा कासम शेख यांनी शहर पोलिस स्टेशनला तक्रार दिली . मृतकाचा बाप शे.कासम शे.गफूर यानेच मुलाचा खून केल्याचा संशय व्यक्त केला आहे . तक्रारीनुसार आरोपीची पत्नी व मृतकाची आई ही मागील १५ दिवसांपासून माहेरी माटरगांव येथे तिची दोन मुले व चार मुलींसह राहायला गेलेली होती . तर सलिम बहिणीचे लग्न असल्याने १५ मे रोजी शनिवारी मसाला खरेदी करण्यासाठी शेगावला गेला होता . त्यावेळी त्याने शेगावी मुक्काम करणार असल्याचे आईला सांगितले होते . त्यानंतर १६ मे रोजी मृतकाच्या मामाच्यामोबाईलवर शेगाव येथून फोन आला की त्याचा भाचा शे.सलिम हा गरीब नवाज मशिदच्या स्टोअर रूममध्ये मरण पावलेला आढळून आलेला आहे . माहिती मिळताच फिर्यादी तिची मुलगी शमिम व मुलगा मो.उमर यांचेसोबत सकाळी शेगाव येथे पोहोचली . पती शे.कासम नेहमीच फिर्यादीला व मुलांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता . त्यावरून बापानेच मुलाचा खून केल्याचा संशय फिर्यादीने दिलेल्या तक्रारीत व्यक्त केला . पोलिसांनी बापाविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता ,

आरोपीस अटक ,

घटना घडली तेव्हा पासून संशयित आरोपी शेख कासम हा फरार झाला होता पोलिसांनी त्याचा शोध सुरू घेतला असता काही लोकांनी त्याला बाळापूर येथे पाहिले होते त्या मुळे बाळापूर पोलिसांच्या मदतीने आरोपीच्या मुसक्या अवळण्यात आल्या ,

 

होय मीच मारले त्याला ???

माझ्या मुलास मीच यमदसनी पाठविले गेल्या महिना भरा पूर्वी माझे व माझ्या मेवहण्याचे भांडण झाले होते तेव्हा माझ्या मुलाने आपल्या मामाची बाजू घेतली होती त्या मुळे त्याच्यावर माझा राग होता मुलीच्या लग्ना साठी काही पैसे जमून ठेवले होते त्या मधून मी 3000 रुपये मागितले होते पण मुलाने पैसे देण्यास नकार दिला म्हणू न मी रात्री रुमालाने त्याचा गळा आवळला व त्याची हत्या केली अशी कबुली आज आरोपीने पोलिसांना दिली ,

अन लग्न झालेच नाही ,

आज मृतक मुलाच्या बहिणीचा लग्न होणार होता त्या साठीच तो मसाला समान घेण्यासाठी शेगाव येथे आला होता आरोपी त्याच्यावर पाळत ठेऊन होता अखेर आरोपीने डाव साधला व मुलास मारून टाकले भाऊ देवा जवळ गेला बाप जेलात गेला त्या मुळे हा लग्न सोहळा रद्द करण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे ,