Home नांदेड टाऊन मार्केट प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष

टाऊन मार्केट प्रभाग क्रमांक 10 मधील जनतेच्या आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष

320

संतोष भद्रे

नांदेड टाऊन मार्केट प्रभाग क्रमांक 10 या भागामध्ये सहा ते सात कोविड सेंटर उभारण्यात आलेले आहेत हे सर्व दवाखाने या भागातील लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोका निर्माण करत आहेत पेशंट ऍडमिट होणाऱ्या रस्त्यापासून ते पेशंटला भेटण्यास येणारी त्यांचे नातेवाईक व इतर सर्व लोक या नियमाचे उल्लंघन करत आहेत. याबद्दल माननीय आयुक्त वाघाळा महानगरपालिका यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन तंतोतंत प्रयत्न करत आहे. पण या ठिकाणी नांदेड प्रभाग क्रमांक 10 टाऊन मार्केट या भागातील जनतेच्या आरोग्याशी महापालिका का खेळत आहे हे कळत नाहीये? या भागात कोबी सेंटरच्या आजूबाजूस कचराकुंडी नियोजन नाही तात्काळ महानगरपालिकेने कचराकुंडीचे नियोजन देखील करावी व रोजच्या रोज यामध्ये सेंटरच्या रस्त्यापासून ते मुख्य रस्त्यापर्यंत आजूबाजूच्या घरापाशी फवारणी करण्यात यावी जेणेकरून या भागातील लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही वापरलेली माक्स रस्त्यावर फेकले जात आहेत. या भागातील लोकांच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे व माननीय आयुक्त वाघाळा महापालिकेच्यावतीने याठिकाणी तात्काळ कुंडीचे नियोजन व दवाखान्याच्या आजूबाजूच्या परिसरात त्यांचे नातेवाईक या यांनादेखील व्यवस्थित मार्गदर्शन करून या भागातील नागरिकांच्या आयुष्यासाठी होणाऱ्या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन उपाययोजना कराव्यात जेणेकरून कोबीडच्या येणाऱ्या तिसऱ्या लाटेमध्ये या भागातील जनता सुखरूप राहील महानगरपालिकेने तात्काळ या तिसऱ्या लाटेच्या आधी उपाययोजना कराव्यात अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील एकही कोविड सेंटर चालू देणार नाही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर सचिव महेश ठाकूर यांच्या वतीने प्रभाग क्रमांक दहा टाऊन मार्केट येथील जनतेच्या आरोग्याविषयी मनपा आयुक्त यांना निवेदन देण्यात आले यावेळी सुभाष भंडारे, संतोष सूनेवड, अनिकेत परदेशी, माधव कंकाळ, सांगा जाधव, शुभम जाधव, ऋषिकेश खंदारे, विशाल सूर्यवंशी, आदी उपस्थित होते.