Home जळगाव जमात-ए-इस्लामी कोवीड टास्क (covid-19) फोर्स ची जिल्हा अधिकारी सोबत बैठक व चर्चा…

जमात-ए-इस्लामी कोवीड टास्क (covid-19) फोर्स ची जिल्हा अधिकारी सोबत बैठक व चर्चा…

94
0

रावेर (शरीफ शेख)

जळगाव जमात-ए-इस्लामी चे अध्यक्ष सोहेल अमीर साहेब यांचे नेतृत्वात कोवीड टास्क फोर्स चे सदस्यांनी माननीय जिल्हा अधिकारी साहेबांची भेट घेतली त्यांना टास्क फोर्स चे कार्याची माहिती दिली व पुढील रणनीतीबाबत चर्चा केली
जळगाव जमात-ए-इस्लामी तर्फे कोरोणा रुग्णांना मोफत ऑक्सीजन सिलेंडर चे वाटप करण्यात आले सोबत कोरोणा रुग्णांना मोफत समुपदेशन साठी डॉक्टर चे दूरध्वनी क्रमांक देण्यात आलेले आहेत ..प्रतिनिधी मंडळाने सरकारला मंजूर निधी आणि रुग्णांना मदत वाटण्यात यशस्वी भूमिका बजावण्याची विनंती केली त्याच वेळी औषधांचे काळा बाजारावर नियंत्रण ठेवण्याची ही विनंती करण्यात आली ज्या द्वारे लोकांना रोगांच्या काळात सोय होईल. यावेळी जिल्हाधिकारी यांना जमात-ए-इस्लामी तर्फे करण्यात येणारे कल्याणकारी व समाजसेवी कामांची माहिती देण्यात आली तसेच कोरोणा रुग्णांबाबत शासनाच्या वैद्यकीय सेवा मधील पुढील सुधारणा बद्दल सल्लामसलत करण्यात आली व निवेदनही देण्यात आले..
शिष्टमंडळात आरिफ देशमुख कोवीड( टास्क फोर्स कॉर्डिनेटर) रेहान खाटीक वसीम भाई शाहीद भाई आदींचा समावेश होता…