Home विदर्भ यवतमाळ जिल्हात 815 जण पॉझेटिव्हसह  1010 कोरोनामुक्त तर बाहेर जिल्ह्यातील दोन मृत्युसह 23...

यवतमाळ जिल्हात 815 जण पॉझेटिव्हसह  1010 कोरोनामुक्त तर बाहेर जिल्ह्यातील दोन मृत्युसह 23 मृत्यु

277

कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जवळपास 200 ने जास्त/…!

       यवतमाळ, दि. 10 : जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-यांचा आकडा 195 ने जास्त आहे. जिल्ह्यात 815 जण पॉझेटिव्ह आले असून 1010 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील दोन मृत्युसह जिल्ह्यात एकूण 23 मृत्युची नोंद झाली. यातील वैद्यकीय महाविद्यालयात 17, खाजगी कोव्हीड रुग्णालयात चार आणि डीसीएचसीमध्ये दोन मृत्यु झाले.

जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6589 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 815 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5774 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7088 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2689 तर गृह विलगीकरणात 4399 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63652 झाली आहे. 24 तासात 1010 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 55047 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1517 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.14, मृत्युदर 2.38 आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 65 वर्षीय पुरुष, तालुक्यातील  65, 62, 68 वर्षीय पुरुष व 62, 68 वर्षीय महिला, मारेगाव तालुक्यातील 40  वर्षीय पुरुष, वणी येथील 60 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, दारव्हा येथील 84 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष, राळेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, तालुक्यातील 52 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 75 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, माहूर (जि. नांदेड) येथील 58 वर्षीय पुरुष आणि अमरावती येथील 65 वर्षीय वर्षीय पुरुष आहे.

जिल्ह्यातील डेडिकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये मृत झालेल्यांमध्ये महागाव तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष, झरी तालुक्यातील 78 वर्षीय पुरुष आहे. तर खाजगी रुग्णालयांत मृत्यु झालेल्यांमध्ये वणी येथील 79 वर्षीय पुरुष, कळंब येथील 60 वर्षीय पुरुष, उमरखेड येथील 65 वर्षीय पुरुष आणि महागाव येथील 66 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

            सोमवारी पॉझेटिव्ह आलेल्या 815 जणांमध्ये 492 पुरुष आणि 323 महिला आहेत. यात वणी येथील 143 पॉझेटिव्ह रुग्ण, दारव्हा 112, यवतमाळ 73, दिग्रस 62, झरीजामणी 49, बाभुळगाव 47, पुसद 46, मारेगाव 46, पांढरकवडा 43, नेर 42, राळेगाव 41, आर्णि 36, घाटंजी 24, महागाव 24, कळंब 18, उमरखेड 6  आणि इतर शहरातील 3 रुग्ण आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 484579 नमुने पाठविले असून यापैकी 482662 प्राप्त तर 1917 अप्राप्त आहेत. तसेच 419010 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

 

जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 737 बेड उपलब्ध : जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 29 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 737 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 426 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 151 बेड शिल्लक, सात डीसीएचसीमध्ये एकूण 386 बेडपैकी 147 रुग्णांसाठी उपयोगात, 239 बेड शिल्लक आणि 29 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1044 बेडपैकी 717 उपयोगात तर 347 बेड शिल्लक आहे.