Home विदर्भ प्रल्हाद मोटवाणी व प्रेम महिले यांचे पुढाकाराने कारंजात लोकसहभागातून 40 खाटांचे विलगीकरण...

प्रल्हाद मोटवाणी व प्रेम महिले यांचे पुढाकाराने कारंजात लोकसहभागातून 40 खाटांचे विलगीकरण केंद्र ऊपलब्ध…

450

ईकबाल शेख

कारंजा –  जिल्हाधिकारी वर्धा यांचे आदेशान्वये कारंजा शहरात सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांकरिता विगलीकरण कक्ष सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहे. खाटांची व ईतर व्यवस्था नगर पंचायत कारंजा ला करायची होती. परंतु कोणतीही व्यवस्था नसतांना रुग्ण कसा थांबणार ही बाब लक्षात येताच माजी शिक्षण सभापती प्रेम महिले यांनी कारंजा शहरातील समाजसेवेचा वारसा असणारे व शासकीय कंत्राटदार श्री प्रल्हादभाऊ मोटवाणी जे अनेक दिवसापासून काहीतरी करावे हा विचार त्यांचे मनात होता. त्यांना महिले यांनी आपण विलगीकरण केंद्राला खाटा द्यायच्या आहेत असे सांगितले. तेव्हा त्यांनी तात्काळ व्यवस्था करा मी रक्कम देतो असे सांगितले त्यांनी त्यांचे कंत्राटदार सदस्य व मित्रपरिवार यांचेशी संपर्क साधून 50,000 ₹ रक्कम दिली.परंतु साधारणतः 40 खाटांचा पूर्ण खर्च अंदाजे हा 1,23,200 ₹ इतका होता.उर्वरीत ईतर निधी कसा उभा करता येईल याबाबत महिले यांनी अजय भोकरे व शरद बोके यांचेशी संपर्क साधला व त्यांनी 10,000 ₹ चे सहकार्य केले, 30,000 ₹ महिले परिवार (मोतिसिंग महिले, गणेशसिंग महिले व प्रेम महिले) यांनी
तर सोबतच सेवानिवृत्त मुख्याध्यापक व पत्रकार असलेले विलास वानखडे सर व त्यांचा मुलगा साईराम मेडिकल कारंजाचा संचालक शुभम वानखडे या पितापुत्रांकडून 5000 ₹ चे सहकार्य केले. अशातच कारंजा तील काही युवक ज्या समवयस्क युवकांचा *”तेरी मेरी यारी”* नावाचा व्हाटसअप ग्रुप आहे त्यांनी सुद्धा आरोग्य व्यवस्थे करीता निधी गोळा केलेला होता त्यांनी 10,000 ₹ दिले. तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा कारंजा यांनी 10,000 ₹ , कारंजा येथील विरल जनरल चे संचालक दिनेशजी रायचूरा 10,000 ₹ यांचे तर्फे देण्यात आले आहे.
भाकरे महाराज सेवाश्रम येथे पुरुष व प्रगती पॅलेस येथे महिलांसाठी सुरू करण्यात येत असलेल्या विलगीकरण केंद्रातील रुग्णांसाठी अधिक व्यवस्था करण्याचा नागरिकांचा प्रयत्न आहे तसेच या ठिकाणी रुग्णसंख्या वाढल्यास व भोजन व्यवस्था केल्यास रुग्णसेवेसाठी *पूर्ण वेळ देण्याचा संकल्प कमलेश कठाणे, माजी, ग्रा. प. सदस्य , भगवान बोवाडे यांनी, हेमंत बन्नगरे, चंदू जसुतकर व सतिष इंगळे* यांनी केलेला आहे
प्रशासनावर विसंबून न राहता आपल्याच लोकांसाठी आपणही काही करावे हा मानस कारंजा वासीयांचा आहे.या योजनेत सामाजिक भावनेतून सढळ हाताने सहकार्य करणार्या कारंजावासियांच्या पुढाकाराबद्दल आभार व्यक्त केले आहे व विशेष बाब म्हणजे या व्यवस्थेत पुढाकार घेणारे प्रेम महिले हे कोविड पॉसिटीव्ह असून सुद्धा त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने फोन वरच हे सर्व नियोजन केलेले आहे…
शहरातील सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी घरी न राहता सदर निशुल्क विलगीकरण कक्षात राहावे असे आवाहन नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे जेणेकरून कोरोनावर मात करणे सोईचे होईल..