Home विदर्भ व्हाट्सएप फक्त करमणुकीचे नाहीतर तर एक सामाजिक कार्य सिद्ध करण्याचे व्यासपीठ होऊ...

व्हाट्सएप फक्त करमणुकीचे नाहीतर तर एक सामाजिक कार्य सिद्ध करण्याचे व्यासपीठ होऊ शकते हेच सिद्ध केले , “तुझी माझी यारी मित्रपरिवार”

137

कारंजा ग्रामीण रुग्णालयास १२ ऑक्सिजन फ्लो मीटर ची मदत.

इकबाल शेख

वर्धा –  कारंजा गावात बालपणापासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेतलेल्या व पुढील काळात व्यावसायिक शिक्षण घेऊन देशाच्या विविध भागात व्यवसायाने उद्योजक, शेतकरी, डॉक्टर, इंजिनिअर, पोलीस, शिक्षक व इतर क्षेत्रात कार्यरत असलेले मित्र एकमेकांशी व्हाट्सएप्प च्या माध्यमातून जुळले.
कोरोनाकाळात सगळीकडे आरोग्य सेवेच्या बाबतीत भीषण परिस्थिती निर्माण झाली. अनेकांनी यात मदतीचा हात दिला. आपले सुद्धा या कठीण परिस्थितीत योगदान असावे अशी प्रत्येकाची इच्छा होती. ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था पुरेशी नव्हती. यातच कारंजातील विद्यालयात शिक्षक असलेल्या मित्राने गावातील प्रत्यक्ष परिस्थितीचा अनुभव मित्रांसमोर मांडला. क्षणाचाही विलंब न करता ज्या गावातून आपण घडलो ज्या गावाने आपल्याला ओळख दिली त्या गावासाठी आपल्याला काहीतरी करता येईल या इच्छेने मित्रांनी निधी गोळा करण्यास सुरुवात केली. अवघ्या तीन दिवसात ७५,१११/- रुपयांचा निधी गोळा झाला. यातच कारंजा येथील विलगिकरण केंद्र उभारण्याकरीता या मित्रांनी बेड करिता १००००/- ची मदत दिली. कारंजा ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन सिलेंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध होते परंतु त्याचा वापर एकावेळी अनेकांसाठी होण्याकरीता ऑक्सिजन फ्लो मीटर ची गरज आहे असे माहीती झाले आणि संपूर्ण मार्केट मध्ये फ्लो मीटर चा तुटवडा असताना या मित्रपरिवरातील व्यवसायाने अमरावती येथे स्वतःचे मेडिकल असलेल्या मित्राने लवकरात लवकर १२ फ्लो मीटर ची पूर्तता करून दिली. आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांनी सुद्धा या कठीण परिस्थितीत फ्लो मीटर उपलब्ध करून दिल्याने या मित्रपरिवाराचे आभार मानले. पुढेही अडचणीच्या काळात आम्ही वेळोवेळी सामाजिक कार्य करत राहू अशी इच्छा व्यक्त केली….