Home पुणे लोकडाऊन मुळे बेरोजगार झालेल्या तरुणाने पत्नी व लहान मुलास मारून टाकले ,

लोकडाऊन मुळे बेरोजगार झालेल्या तरुणाने पत्नी व लहान मुलास मारून टाकले ,

1015
0

 

 

हृददायक घटना ,

 

अमीन शाह ,

पुणे : कामधंदा मिळत नसल्यामुळे एका तरुणाने अवध्या एक वर्षाच्या मुलावर चाकू फिरवून खून केला . त्यानंतर बायकोला गळा दाबून मारून स्वतः ही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात कदम वाक वस्तीवर घडली आहे . या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रज्ञा हनुमंत शिंदे ( वय २८ ) आणि मुलगा शिवजेत ( वय एक वर्षे , दोन महिने ) या दोघांचा खून केल्यानंतर हनुमंत दर्याप्पा शिंदे ( वय ३८ , रा . कदमवाक वस्ती , लोणी काळभोर ) याने आत्महत्या केली आहे . याबाबत दर्याप्पा अर्जुन शिंदे ( रा . बक्षिहिपरगा , ता . दक्षिण सोलापूर ) यांनी तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शिंदे कुटुंबीय कदमवाक वस्तीवर राहायला होते.हनुमंत हा सिमेंटचे टेम्पोवर ड्रायव्हर म्हणुन कामास होता . त्याची पत्नी प्रज्ञा ही घरकाम करून घरामध्ये शिवणकाम करत होती . हनुमंत यास लॉकडाउनमुळे काम नसल्याने गेल्या आठ दिवसापासून तो घरी होता.त्यामुळे कंटाळून त्याने रविवारी सकाळी पत्नीचा गळा आवळून खून केला . त्यानंतर स्वतःच्या एका वर्षाच्या मुलाचा चाकूने गळा कापून खून केला . स्वतः बेडरूममधील पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली .
शिंदे कुटुंबीय मूळचे सोलापूर जिल्ह्यातील असून मागील काही दिवसांपासून ते लोणी काळभोर परिसरात कदम वाक वस्तीवर राहत होते . मात्र , बेरोजगारी निर्माण झाल्याने हनुमंत यांनी संपूर्ण कुटुंब संपवून टाकले आहे . घटनेनंतर सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते आणि इतर पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली . याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे .