Home विदर्भ भाकरे महाराज सेवाश्रम यांनी दिला संतांच्या शिकवणीचा परिचय 

भाकरे महाराज सेवाश्रम यांनी दिला संतांच्या शिकवणीचा परिचय 

614

ईकबाल शेख

विलगिकरण कक्षासाठी खुला केला सेवाश्रम –


वर्धा जिल्हा कारंजा घाडगे तालुका कारंजा शहरातील निसर्गाच्या सानिध्यात असणारे व श्री संत भाकरे महाराज यांचे स्पर्शाने पावन झालेले स्थान म्हणजे श्री संत भाकरे महाराज बागेश्री संस्थान. येथील संचालक मंडळ व सेवकरी ज्यांनी महाराजांच्या शिकविणीप्रमाणे आपली जीवनशैली बनविली आहे. असाच एक परिचय म्हणजे आपल्या संस्थान चे नवनिर्मित सभागृह नगर पंचायत कारंजाला विलगीकरण कक्षासाठी देऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकारी वर्धा यांनी नगर पंचायत स्तरावर विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत आदेशीत केले तेव्हा जागेसोबतच पुरेपूर स्नानगृह व नैसर्गिक सानीघ्यात असणारे भाकरे महाराज सेवाश्रम पुरुषांसाठी चांगले ठिकाण असू शकते असे जाणवले.
तेथील संचालक मंडळाला संपर्क साधला व आपली अडचण सांगितली व त्यांनी क्षणाचाही विलंब न करता संत भाकरे बाबांनी आम्हाला रुग्णांची सेवा करण्याचा संदेश दिलेला आहे. या पवित्र स्थानाचा वापर जर रुग्णांसाठी होत असेल तर आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील असे म्हणत तेथील सभागृह विलगिकरण कक्षासाठी खुले करून दिले. तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याचे सांगितले व श्री. संत भाकरे महाराज यांचे आशीर्वादाने येथे राहणारे रुग्ण लवकर बरे होतील हा विश्वास दर्शविला.संस्थानच्या या सामाजिक कार्याबद्दल ऋणी आहोत.