Home विदर्भ शरदभाऊ सावरकर – समाज कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्त्व.

शरदभाऊ सावरकर – समाज कार्यात अग्रेसर व्यक्तिमत्त्व.

105
0

ईकबाल शेख.

कारंजा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरू करण्याबाबत जागा उपलब्धतेबाबत श्री. घाडगे, प्रशासकीय अधिकारी, न.पं. कारंजा यांनी माझ्याशी चर्चा केली तेव्हा त्यांना मी महामार्गावर नव्याने उभे सुंदर असे प्रगती पॅलेस महिलांसाठी विलगीकरणा साठी सुरक्षित असल्याचे सुचविले परंतु नव्याने उभी केलेली वास्तू मिळेल की नाही ही शंका मनात होती, तेव्हा राजुभाऊ गुप्ता यांचे मार्फत श्री. शरद भाऊ यांना फोन लावला व सविस्तर पणे अडचण सांगीतली तेव्हा शरद भाऊ यांनी क्षणाचाही विलंब न करता निशुल्क तत्वावर सभागृहाकरिता होकार दिला तेव्हा फार आश्चर्य वाटले की ओळख नसतांना फक्त फोन च्या संभाषणातून कोणी येवढे उदार मनाने सहकार्य करणारे व्यक्तीमत्व आजही या जगात आहे, एवढेच नव्हे तर पुलगाव ला सुद्धा त्यांचे असेच समाजकार्य आहे…
भाऊ आपण पुलगाव निवासी असून कारंजा वासीयांच्या मदतीला योग्य वेळी धावून आलात त्याचे ऋण आम्ही कधीच विसरू शकणार नाही….