Home विदर्भ यवतमाळ तालूक्यातील साकुरच्या अडाण नदीमधुन रेती चोरी सुरुच

यवतमाळ तालूक्यातील साकुरच्या अडाण नदीमधुन रेती चोरी सुरुच

719

शिक्षक करतो हफ्ता वसुली

तलाठी म्हणते…….भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.


यवतमाळ – तालुक्याची अंतीम सिमा असलेल्या साकुरच्या अडाण नदीमधुन, महसुल विभागाच्या नाकावर टिच्चुन दिवस राञ अमर्याद रेती चोरी केली जात आहे. विशेष म्हणजे रेती चोरांकडुन हफ्ता वसुली करण्यासाठी एक मास्तर ट्रॅक्टर च्या मागेमागे धावत असतो. हा हफ्ताखोर शिक्षक महसुल कर्मचारी महीलेचा पती असल्याचे, रेतीचोरांचा दलाल विनोद सागतो. त्या शिक्षकाला स्थानिक तलाठी..करा वसुली..
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. असे सांगत असल्याने, दिवस राञ अडाण नदीचे लचके तोडुन रेती चोरी केली जात आहे. सबंधीत महसुल कर्मचारी आणि वादग्रस्त शिक्षक साकुरला एका घरात नारायण..नारायण..चा जप करीत सावज टिपत असते. अडाण नदीला आपली खाजगी मालमत्ता समजुन रेती चोरांकडुन लाखो रुपयांची महीन्याकाठी वसुली केली जाते. या अनितीच्या प्राप्त पैस्यातुन कोट्यवधी रुपयाचे घर चोरोची रेती वापरुन ऊभे केले जात आहे. विद्यार्थ्यांच्या बाल मनावर योग्य संस्कार बिंबविण्याऐवजी शिक्षक हफ्ता वसुलीचे काम करतअसल्याने साकुर (गणगाव) मंगरूळ ,आणि बेलोरा परीसरात त्या हफ्ताखोर शिक्षक विरुध्द प्रचंड असंतोष खदखदत आहे. साकुर गावातुन सतत रेती चोरी करणा-या ट्रॅक्टरचा राबता असल्याने, रस्त्याची पुरती चाळण झाली आहे. शिवाय धुळीच्या कणांमुळे गावात अनेकांना श्वसनाचे आजार जडले असल्याची साकुर वासीयांची तक्रार आहे.महीला तलाठी यांच्या पैसे द्या, रेती चोरा, या एक कलमी कार्यक्रमामुळे गावा गावात प्रचंड असंतोष खदखदत आहे. शासनाच्या लाखो रुपयाचा महसुल बुडऊन स्वतः चे घर भरणा-या वादग्रस्त तलाठीवर महसुल प्रशासन ईतके मेहरबान का?असा सवाल परिसरात विचारला जात आहे. जिल्हाधीकारी यांनी साकुर,मंगरूळ, बेलोरा, सह आर्णी तालुक्यातील गणगावच्या अडाण नदीमधुन राजरोसपणे रेती चोरी करणा-यांना दंडीत करुन, साकुरच्या महीला तलाठी यांची हकालपट्टी करावी अशी मागणी नाकरीकांनी केली आहे. न्याय न मिळाल्यास रास्ता रोखो आंदोलन छेडण्याचा ईशारा दिल्याने तलाठी महीलेच्या पाया खालची वाळु सरकली आहे.