Home जळगाव रमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA”...

रमजान ईद पुर्वी शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पगार करण्यात यावी – “AIITA” ची मुख्यमंत्री कडे मागणी

81
0

रावेर (शरीफ शेख)

सध्या मुस्लिम बांधवाचा पवित्र रमजानचा महिना सुरू आहे . रमजान ईद हा मुस्लिम बांधवासाठी एक मोठा सण असतो . रमजान ईद १३ किंवा १४ मे रोजी ( चंद्र दर्शन प्रमाणे ) असल्याने व रमजान ईद मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहाने साजरी करतात . ईदच्या वेळी नवीन कपडे , वस्तू खरेदी करतात . पर्यायाने आर्थिक टंचाई येऊ नये म्हणूनन राज्यातील सर्व खाजगी,जि.प., मनपा,नगर परिषद, प्राथमिक व माध्यमिक शाळेतिल शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची माहे एप्रिल 21 चे वेतन व जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची मार्च व एप्रिल 21 चे वेतन आणि राज्यात २० % व ४० % वेतन देय होणाऱ्या शाळा चे ऑफलाईन वेतन ईद पूर्वी म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसांत ईद च्या ३ दिवसा पूर्वी करण्यात यावे अशी विनंती चे पत्र ऑल इंडिया आइडियल टीचर्स एसोसिएशन चे प्रदेश अध्यक्ष सैय्यद शरीफ सैय्यद यूनुस यानी मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड़ याना केली आहे.