Home नांदेड आंध्रप्रदेश सरकारने कोविड रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा केली सुरू तर महाराष्ट्राच्या राज्यकर्तेंनी...

आंध्रप्रदेश सरकारने कोविड रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा केली सुरू तर महाराष्ट्राच्या राज्यकर्तेंनी सोडले रूग्णांना वाऱ्यावर – गजानन पाटील चव्हाण, नायगांव(बा.)

143

राजेश एन भांगे

राज्यात कोरोना महामारीच्या संकटाने थैमान घालून अनेक लोकांचा बळी घेतला असताना सुद्धा महाराष्ट्रातील सत्ताधारी नेत्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांसाठी काय केले असा प्रश्न उपस्थित करीत महाराष्ट्र राज्याच्या २० किलोमीटर सीमेच्या अंतरावर असलेल्या आंध्राप्रदेशच्या मुखमंत्र्यानी कोविड रुग्णासाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा मोफत उपलब्ध करून दिले आहेत.

तर आपल्या राज्यात राज्य कर्त्यांनी कोविड रुग्णाला अक्षरशः वाऱ्यावर सोडले आहे.

असे मत सामाजिक कार्यकर्ता गजानन पाटील चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

सध्या देशासह अनेक राज्यात कोरोना व्हायरसने मोठा कहर माजवला असल्याने आंध्रप्रदेश व तेलंगाणा या राज्यातील सरकारने कोव्हिड रुग्णांच्या संपूर्ण तपासणी व उपचारासाठी शासकीय निमशासकीय हॉस्पिटलस मोफत उपलब्ध करून दिली असून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी मात्र कोरोनाच्या नावाखाली फक्त लॉकडाऊन लावण्यापेक्षा दुसरे कांहीच केले नाही.
तर गंभीर रुग्णांना रूग्णालयात बेड मिळत नाहीत ते सुद्धा या नेत्यांनी उपलब्ध करून दिले नसल्याचे खंत व्यक्त केली.

कोविड रुग्णांचे उपचारा दरम्यान लाखो रुपये खर्च झाले असताना सुद्धा शासनाच्या सोयी सुविधा वाऱ्यात विरगळल्या की काय असा प्रश्न करीत.
आता तरी राज्याचे मुख्यमंत्री मा.उद्धव ठाकरे यांनी कोविड रुग्णासाठी मोफत सुविधा चालू कराव्यात असे गजानन पाटील चव्हाण म्हणाले.

तसेच जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी शासकीय रूग्णालयात कोविड रुग्णांसाठी अतिशय महत्वाचे समजले जाणारे इंजेक्शन्स सुद्धा उपलब्ध करून दिले नसल्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांना बाहेरून हात पाय जोडून मोठी कसरत करून इंजेकशन खरीदी करावे लागत आहे.

राज्यातील राजकीय नेते, माजी मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण साहेब असो की खासदार प्रताप पाटील चिखलीकर साहेब असो माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष वसंतराव पाटील चव्हाण असो अथवा नायागांव विधान सभा मतदार संघांचे आमदार ना.राजेश पवार असो कि अन्य नेते असो यांनी कोविड रुग्णासाठी काय केले.
एकिकडे रूग्णांकडुन लाखो रुपयाची खाजगी कोविड सेंटर कडून लूट केली जात असताना जिल्ह्यातील पुढारी मात्र आपल्याच तोऱ्यात वावरतांना दिसत आहेत.

आंध्रप्रदेशचे उदाहरण घेतले तर महाराष्ट्रातील सरकारने कोविड रुग्णासाठी
कोणत्या सुविधा राबविल्या हे जनतेला सांगण्याची वेळ आज सत्ताधारी नेत्यांन पुढे आली आहे.

खरे तर आंध्रप्रदेशच्या सत्ताधाऱ्यांनी कोविड रुग्णासाठी मोफत सुविधा चालू केली आणि महाराष्ट्राचे राज्यकर्ते रुग्णाला वाऱ्यावर सोडून दिले आहे असे ही यावेळी गजानन पाटील चव्हाण म्हणाले.

गेल्याच विधान सभा निवडणुकीच्या वेळेस आपले राज्य विकासा पासून कोसोदूर असल्याचे कारण सांगत धर्माबाद तालुक्यातील गावे तेलंगणा राज्याला जोडण्यात यावे म्हणून त्या भागातील लोकांनी जोरदार मागणी केली होती.
तर आजच्या घडिलाही या भागातील नागरिक येथील सरकारच्या धोरणांवर मोठ्या प्रमाणात नाराज आहेत.

ती बाब लक्षात घेऊन
महाराष्ट्र राज्य सरकारने व सर्व पुढाऱ्याने लवकरच काही तरी सकारात्मक निर्णय घेऊन त्वरित अमलात आणावा.

अन्यथा नांदेड जिल्हा सुद्धा तेलंगणा राज्याला जोडण्यात यावा या मागणीसाठी आम्ही
रस्त्यावर उतरू असा इशारा नायगांवचे सामाजिक कार्यकर्ता गजानन चव्हाण यांनी दिला आहे.