Home महत्वाची बातमी महिलेचा राग अनावर झालं अन विपरितच घडल ,

महिलेचा राग अनावर झालं अन विपरितच घडल ,

359
0

 

दुसऱ्या मजल्यावरून फेकलेल्या चिमुकल्याचा मृत्यू ,

अमीन शाह

शेजारणीसोबत झालेल्या किरकोळ भांडणामुळे तिला अद्दल घडवण्यासाठी चौदा महिन्यांचा मुलगा आणि तीन वर्षीय मुलीसह महिलेने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना आज औरंगाबादमधील बजाजनगर येथील जिजामाता हौसिंग सोसायटीत दुपारी 2.45 वाजेच्या सुमारास घडली . या घटनेत महिला व तीन वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली , तर अवघ्या दोन महिन्यांपूर्वी वाढदिवस साजरा केलेला चिमुकला जागीच ठार झाला . याबाबत अधिक माहिती अशी की , मूळ सोलापूर जिल्ह्यातील बारलोणी गावातील सतीश नागनाथ आतकर ( 27 ) हे कुटुंबियांसह वाळुजमध्ये कामानिमित्त येऊन स्थायिक झाले होते . वडगाव गट नंबरमधील एका एजन्सीवर काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते . मागील काही दिवसांपासून आरएक्स -12 जिजामाता कॉलोनी येथील गायकवाड यांच्या घरात ते भाड्याने खोली घेऊन राहत होते . त्यांच्या शेजारी इतरही भाडेकरू राहतात

 

घटनेच्या दिवशी शेजारील महिलेसोबत लहान मुलांच्या कारणावरून किरकोळ वाद झाल्याने महिलेने शेजारणीला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने अवघ्या 14 महिने वयाच्या सोहमला गच्चीवरून खाली फेकले लगेच तीन वर्षीय प्रतीक्षाला सुद्धा वरून खाली फेकले त्यानंतर स्वतः सुद्धा उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला . यात अनिता आतकर ( 23 ) यांच्या डोक्याला व दोन्ही पायाला तर प्रतीक्षाच्या पायांना गंभीर दुखापत होऊन ती जखमी झाली . तर सोहमच्या डोक्याला मार लागल्याने त्याला उलटी होऊन अवघ्या काही क्षणातच त्याचा जागीच मृत्यू झाला . घटनेनंतर याची माहिती प्रसिध्द समाजसेवक सुमित पंडित यांनी पोलिसांना दिली , अभिजित गायकवाड , मनोज जैन , रवी शर्मा आदींनी रुग्ण वाहिकेने महिलेला घाटीत उपचारासाठी दाखल केले . घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांनी त्यांच्या सहकार्या सह घटनास्थळी धाव घेऊन अधिक महिती घेतली ,

 

 

 

माणुसकी ,

 

 

घटने ची माहिती मिळताच प्रसिद्ध समाजसेवक सुमित पंडित यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या महिलेला व दोन चिमुकल्यांना घाटी रुग्णालयात दाखल करून माणुसकीचे दर्शन घ्डविले तर उद्या सुमित पंडित हे त्या 11 महिन्याच्या चिमुकल्या मुलावर अंत्यसंस्कार सुद्धा करणार असल्याची माहिती मिळाली आहे ,