Home मुंबई बौद्ध धर्मगुरू व क्षेत्राच्या सुतभर जागेलाही वाईट नजरेने पाहाल तर डोळे फोडू...

बौद्ध धर्मगुरू व क्षेत्राच्या सुतभर जागेलाही वाईट नजरेने पाहाल तर डोळे फोडू –  पँथर डॉ राजन माकणीकर

205

मुंबई ,  दि. ०३ ,  (प्रतिनिधी) – देशात बहुतांश जमीन ही महारवतणी जमिनी आहेत, त्या जमिनीवर अनेकांनी डल्ला मारला आहे, यापुढे बौद्ध धर्मगुरू आणि त्यांच्या पवित्र क्षेत्राच्या सुतभरही जमिनीवर वाईट नजरेने पाहिले तर ते डोळेच राहणार नाहीत असा सणसणीत इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी प्रसिद्धी माध्यमांद्वारे दिला आहे.

रिपाई टी एम कांबळे गटाचे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी खंत व्यक्त केली की, बौद्ध धम्मगुरु भन्ते करुणानंद बोधी यांनी बौद्ध भिखु प्रशिक्षण केंद्र उभारले आहे, प्रशिक्षण केंद्र लगत रुबाबाने फडकत असलेले पंचशील ध्वज व प्राणी मात्रासाठी पिण्यासाठी बांधलेला हौद आणि पाईप लाईन काढून टाकण्यासाठी काही जातदांडगे अधिकारी आपल्या प्रशासकीय पदाचा दुरुपयोग पूज्य भन्ते करुणानंद बोधी यांना मानसिक त्रास देत आहेत, त्यांना धक्काबुक्की केलेली आहे. हे वर्तन शासकीय अधिकाऱ्याला अशोभणीय असून अश्या हरामखोर पिलावळींना तात्काळ निलंबित केले पाहिजे.

भारत ही धम्मभूमी असून या भूमीवर बौह धर्मगुरूंनाच संरक्षण नसेल तर बौद्ध धर्मीय भिमानुयायी व आंबेडकरी विचारांच्या पक्ष संघटना रस्त्यावर उतरतील मग होणार उद्रेक शासन आणि प्रशासन रोकू शकेल काय? असाही प्रश्न डॉ. माकणीकर यांनी उपस्तिथ केला.

डॉ. माकणीकर पुढे म्हणाले की, बुद्धाच्या विचारांचे आम्ही अनुयायी उपासक अहिंसावादी असलो म्हणून बुजदिल षंढ समजू नका भीमा कोरेगाव रक्तक्रांती करून छत्रपती संभाजी राजेंच्या खुनाचा बदला घेणारे रक्त सळसळते आहे आमच्या अंगात.

भारतातल्या सर्व जमिनी ह्या बौद्धच्याच असून अन्य धर्मीयनीं त्या जमीनिवर अनाधिकृतरीत्या कब्जा केला आहे, महार वतनातल्या बऱ्याच जागा जात व धनदांडग्यांनी बळकावल्या आहेत, आम्हाला त्रास दिलात तर सर्व जमिनीचे पंचनामे करून महार वतनाच्या जमिनी ताब्यात घेण्याचे आंदोलन सुरू करू असाही इशारा डॉ. माकणीकर यांनी दिला.

याद राखा वरिष्ट अधिकाऱ्यांनी तात्काळ या घटनेची तपासणी करावी, बौद्ध क्षेत्र असलेल्या आश्रमाला व पूज्य भदंत करुणानंद बोधी याना संरक्षण देऊन भविष्यात होणारे परिणाम थांबवावे व भन्तेसोबत धक्काबुकीं केलेल्या “त्या” तीन जातीवाद्यावर कडक कारवाई करून त्यांचे निलंबन करावे अन्यथा पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात कॅप्टन श्रावण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली वन कार्यालयावर तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ही महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला