Home विदर्भ वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरी या गावातील गावकऱ्यांनी अजब निर्णय घेतला.

वर्धा जिल्ह्यातील वर्धमनेरी या गावातील गावकऱ्यांनी अजब निर्णय घेतला.

397
0

 रविंद्र साखरे

दिनांक 1 मे 2021 ते 8 मे 2021 या आठ दिवसांच्या कालावधी मध्ये बाहेरील गावातील नागरिकांसाठी हे गाव बंद करण्यात आले आहे, म्हणजे या आठ दिवसात बाहेरील गावातील नागरिकांना या गावात प्रवेश मिळणार नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते, गावात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढू नये तसेच आहे ती संख्या सुद्धा तातडीने कमी होऊन गावातील नागरिकांचे या रोगांपासून संरक्षण व्हावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे यावेळी येथील नागरिकांनी सांगितले. आर्वी तालुक्यातील मध्यम स्वरूपाची लोकसंख्या असलेल्या या गावात आता 18 नागरिक कोरोनाग्रस्तां असल्याचे सुद्धा ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.