Home पश्चिम महाराष्ट्र कोरोना संक्रमिताच्या मृत्यूनंतर त्याच्या खिशातून 35 हजार रुपये चोरले , ,

कोरोना संक्रमिताच्या मृत्यूनंतर त्याच्या खिशातून 35 हजार रुपये चोरले , ,

1194
0

 

चार आरोग्य कर्मचारी निलंबित ,

अमीन शाह ,

सध्या सर्वत्र कोरोना महामारीने हाहाःकार माजला आहे . अशा काळात धुळ्यातून एक लाजिरवानी घटना समोर आली आहे . येथे एका कोरोना संक्रमित रुग्णाचा मृत्यू झाला होता . मृत्यूनंतर त्याला प्लास्टिकच्या बॅगेत पॅक करण्यात आले होते . यानंतर , येथील 4 आरोग्य कर्मचाऱ्यांनी ती बॅग उघढून त्या मृतदेहाच्या खिशातून 35 हजार रुपये चोरले . या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चौघांना निलंबित करण्यात आले आहे . ही घटना धुळ्यातील श्री गणेश मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमधली आहे . कोरोना संक्रमिताच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांसमोर मृतदेह बॅगेत पॅक केला होता . नियम सांगतो की , एकदा बॅगेत पॅक केलेला कोरोना संक्रमिताचा मृतदेह उघडता येत नाही . पण , आरोपींनी तो मृतदेह स्टोअर रुममध्ये नेला आणि खिशातून पैसे चोरले . हा सर्व प्रकार त्या खोलीतील सीसीटीव्हत कैद झाला .

असा झाला प्रकरणाचा खुलासा

यानंतर तो मृतदेह कुटुंबियांकडे देण्यात आला . यावेळी कुटुंबियांनी हॉस्पिटल प्रशासनाला रुग्णाच्या खिशात असलेल्या पैशांबद्दल विचारणा केली . यावेळी हॉस्पिटल प्रशासनाला काहीच उत्तर देता आले नाही . यानंतर हॉस्पिटलचे सीसीटीव्ही चेक करण्यात आले आणि त्यात हा प्रकार उघडीस आला .