Home विदर्भ यवतमाळ जिल्हातील आर्णी तालुक्यात मग्रारोहयो मध्ये कोट्यावधी रूपयाचा भ्रष्टाचार जिल्हाधिकारी लक्ष देतील...

यवतमाळ जिल्हातील आर्णी तालुक्यात मग्रारोहयो मध्ये कोट्यावधी रूपयाचा भ्रष्टाचार जिल्हाधिकारी लक्ष देतील का?

251
0

देवानंद जाधव

यवतमाळ – जिल्ह्यातील भ्रष्टाचाराने आणि महाघोटाळ्याने बरबटलेली समिती म्हणजे आर्णि पंचायत समिती.
महाळुंगी येथे वनजमिनीवर तिस लाखांवर खर्च केला.


शेकडो शौचालये हडपली. गट ग्राम पंचायत चिकणी (क) अंतर्गत भंडारी (ज)येथील आमदार निधी मधील सिमेंट रोड चोरीला गेला. अशा शेकडो अफलातून घटना येथे घडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ( MREGS )
मध्ये पंचायत समितीने भ्रष्टाचाराचे सर्व रेकाॅर्ड तोडले आहे. तालुक्यात अनेक गावांमध्ये मग्रारोहयो अंतर्गत कोट्यवधी रुपयांची थातुरमातुर कामे करण्यात आली. कामाच्या एकुन रकमेच्या निम्मी रक्कम अकुशल मजुरांच्या नावे काढण्यात आली. त्यासाठी ग्रामसेवक आणि रोजगार सेवकांनी नमुना क्रमांक चार रजिस्टर मध्ये खोट्या सह्या करुन, पंचायत समितीची तिजोरी लुटण्याचे पाप केले. गावा गावातील हवसे गवसे नवसे आणि चारचाकी अलीशान वाहनातून फिरणारे लोकांना कागदोपत्री मजुर दाखवले. आणि पं सं. च्या दलालांनी विविध बॅंकेतुन मजुरांकरवी कोट्यवधी रुपये काढले. तालुक्यात गत चार पाच वर्षापासुन विविध गावात कामे केली असल्याचे कागदोपञी दाखवुन मलई चाखण्याचा प्रकार सुरु आहे. कुशल, अकुशल च्या नावावर निघणारी रक्कम पंचायत समितीचे दलाल मोठ्या कुशलतेने हडपत असल्याचे वास्तव आहे. तालुक्यात महाळुंगी हे गाव भ्रष्टाचाराचे माॅडेल म्हणुन बघीतले जाते. चिकणी, कोपरा, सायखेडा, परसोडा, शेलु सेंदुरसनी, ईचोरा, अंबोडा, मुकींदपुर लोणबेहळ, शारी बोरगाव, दाभडी, तेंडोळी ऊमरी, विठोली यरमल हेटी, केळझरा सावळी सदोबा, जवळा, लोणी ऊमरी पठार, देऊरवाडी, सुकळी कापेश्वर, म्हसोला, पांगरी पहुर या गावांसह अन्य गावात सुध्दा, विविध कामे केली असल्याचे दाखवले आहे. त्यामध्ये भूमिगत नाली गटार, नाला सरळीकरण, पुर संरक्षण भिंत, पांदण रस्ता, आणि तत्सम कामी केल्याचे कागदोपत्री दिसते आहे.
एकमेव महाळुंगी या गावातच कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार वसंतराव नाईक विकास महामंडळ मुंबई चे माजी संचालक अनिल विजयसिंह नाईक यांनी केली आहे. एकाच गावात डोंगरा एवढा भ्रष्टाचार असेल तर तालुक्यातील भ्रष्टाचाराचा आकडा हा गणकयंञाचा स्फोट होईल ईतका असेल असे दिसते. महाळुंगीच्या भ्रष्टाचाराची चौकशी सुरु झाली आहे. पण पंचायत समिती अंतर्गत सरसकट मग्रारोहयो ची सखोल ऊच्च स्तरीय चौकशी करावी अशी आर्णि तालुक्यातील जनतेची अपेक्षा आहे.महाळुंगी येथील गैरप्रकाराच्या चौकशीचे आदेश अमरावती विभागीय उपायुक्त यांनी पञ क्र/विआअ/रोहयो/कली/कावी/२६९|२०२० दि. १९जुन २०२०ला दिले आहेत शिवाय जिल्हा परिषद ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा)यांनीही आर्णि च्या गट विकास अधिकारी यांना क्र/यजीप/मग्रारोहयो/तां .स.(स्था)१|८९९|२०२०अन्वये चौकशीचे आदेश दिलेत माञ पंचायत समितीची तिजोरी लुटणा-यांना अभय देण्याचे पाप सबंधीतांकडुन होत आहे. जिल्हाधीकारी यांनी गांभीर्याने दखल घेऊन भ्रष्टाचा-यांना धडा शिकवावा आणि फौजदारी कारवाई करुन तालुक्यातील जनतेला न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील गावा गावातुन होत आहे. तुर्तास मग्रारोहयो मधील भ्रष्टाचाराच्या तक्रारी करण्यासाठी खास तरुणाई पुढे सरसावली आहे हे विशेष.