Home विदर्भ शिवसेनेतर्फे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला ऑक्सिजन काँसंट्रेटर भेट

शिवसेनेतर्फे शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला ऑक्सिजन काँसंट्रेटर भेट

152
0

आमदार संजय राठोड यांचा स्वयंस्फूर्त पुढाकार

यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे आज माजी मंत्री आमदार संजय राठोड व  जिल्हा शिवसेनेतर्फे फिवर ओपीडी येथे रुग्णांसाठी पाच ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून देण्यात आले.फिवर ओपीडी मध्ये रिपोर्ट प्राप्त होई पर्यंत ऑक्सिजन किंवा रुग्णालयात बेड उपलब्ध होई पर्यंत ऑक्सिजन अभावी रुग्णाची स्थिती खालावते हे लक्षात आल्याने माजी मंत्री व शिवसेना आमदार संजय राठोड यांनी सदर ऑक्सिजन काँसंट्रेटर स्वखर्चातून उपलब्ध करून दिले आहेत.मागील कोरोना लाटेत सुद्धा आमदार संजय राठोड यांचे तर्फे हजारो गरजवंतांना मोफत भोजन,बाहेर राज्यात व शहरक्त अडकलेल्या यवतमाळ जिल्हा वासीयांना आर्थिक मदत,पोलीस,नगरपालिका व महसूल प्रशासनाला मोफत सॅनीटायझर,मास्क व साबण वाटप करण्यात आले होते.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयातर्फे ह्या प्रसंगी वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ गवार्ले, कोविड विभाग प्रमुख डॉ जतकर, डॉ मानकर,डॉ हिवरकर,डॉ राठोड,राऊत सिस्टर,प्रतिभा वानखेडे सिस्टर उपस्थित होते तर शिवसेनेतर्फे जिल्हा परिषद अध्यक्षा कलिंदा यशवंत पवार,नगरपरिषद अध्यक्षा कांचनताई बाळासाहेब चौधरी,शिवसेना जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,जिल्हा परिषद सभापती श्रीधर मोहोड,विजय राठोड,उपजिल्हा प्रमुख गजानन डोमाळे,यशवंत पवार,शासकीय वैद्यकीय रुग्णालय अभ्यागत मंडळ सदस्य विकास क्षीरसागर,डॉ महेश चव्हाण,सौ सागरताई पुरी,युवासेना जिल्हा प्रमुख विशाल गणात्रा, मॉं आरोग्य सेवा समितीचे रुग्ण सेवक रवी जाधव,बजरंग बायस्कर,अमित निघोट, सुवासिक खडसे,मनोज दातार प्रामुख्याने उपस्थित होते.

*का आहे ऑक्सिजन काँसंट्रेटरची आवश्यकता?*

यवतमाळ जिल्ह्यामध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.कोरोना मध्ये गंभीर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊन त्यांचे शरीरातील ऑक्सिजन झपाट्याने कमी होतो.तालुका स्तरावर शासकीय यंत्रणेजवळ ऑक्सिजन बेड उपलब्ध नाहीत त्यामुळे अनेक गंभीर रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे येतात.सर्व जिल्ह्यातील रुग्ण शासकीय वैद्यकीय रुग्णालयात येत असल्याने रुग्णालयावर खूप ताण आला आहे.शासकीय वैद्यकीय रुग्णालय येथे बेड उपलब्ध नसल्याने गंभीर परिस्थिती आहे.शासकीय वैद्यकीय रुग्णालयात कोविड रुग्ण ओळखण्याकरिता फिवर ओपीडी उघडण्यात आली आहे.ग्रामीण भागातील अनेक रुग्ण हे सुरुवातीला घरीच उपचार घेतात व गंभीर परिस्थिती झाल्यावर रुग्णालयात येतात.शासकीय नियमांप्रमाणे लक्षणे जरी कोविडची असली तरी तपासणी व कोविड रिपोर्ट असल्याशिवाय रुग्णाला कोविड वार्ड मध्ये दाखल करता येत नाही.अशा वेळेस शरीरातील ऑक्सिजन पातळी खालावल्याने रुग्णाची स्थिती आणखीन गंभीर होते.फिवर ओपीडी येथे ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रिपार्ट येईपर्यंत व बेड उपलब्ध होई पर्यंत अनेक रुग्ण तेथे अधिक गंभीर होतात.त्यामुळे फिवर ओपीडी येथे हे रुग्ण गंभीर होऊ नये म्हणून व तेथे आवश्यक त्या रुग्णास ऑक्सिजन देता यावा म्हणून तेथे ह्या ऑक्सिजन काँसंट्रेटरची आवश्यकता होती व ती आज स्वखर्चातून शिवसेना व माजी मंत्री व आमदार संजय राठोड यांचे पुढाकाराने पूर्ण झाली.

हे वाचा…!

जिल्हयात 50 ऑक्सिजन काँसंट्रेटर  उपलब्ध करून देणार – आमदार संजय राठोड

सध्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहू जाता जिल्ह्यात एकूण 50 ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहोत.सध्या एकूण 25 ऑक्सिजन काँसंट्रेटर यवतमाळ येथे उपलब्ध झाले आहेत त्यातील पाच आज फिवर ओपीडी येथे आम्ही देत आहोत.येत्या काळात तालुका पातळीवर सुद्धा ही सुविधा स्वखर्चातून उपलब्ध करून देणार आहोत जेणे करून ग्रामीण भागातील रुग्णांची परवड थांबेल.