Home जळगाव ४ वर्षाच्या अब्दुल हादी याने ठेवला पहिला उपवास (रोज़ा)

४ वर्षाच्या अब्दुल हादी याने ठेवला पहिला उपवास (रोज़ा)

374
0

रावेर (शरीफ शेख )

पवित्र रमजान महिन्यात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण करून रावेरातील बुरहानपुर रोड येथील रहिवासी अब्दुल हादी शेख मजीद (वय ४)याने आठवा रमजानचा रोज़ा आपल्या जीवनातला पहिला रोज़ा ठेवला. सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी ४.४२ वाजेपासून ते सायंकाळी ६.४९ वाजेपर्यंत अन्नाच्या एक कण आणि पाणी च्या आधारावर उपाशी पोटी राहून यांने (अल्लाह) ईश्वर प्रती श्रद्धा व्यक्त केली. भारत देश कोरोना मुक्त होण्यासाठी अल्लाह ला या मुलाने साकडे घातले. एवढ्या कमी वयात आपल्या जीवनाचा पहिला रोज़ा पूर्ण केल्याबद्दल या मुलाचा सर्वत्र अभिनंदन होत आहे. तो फरीद होमगार्ड यांचा नातु आहे.