Home महत्वाची बातमी कोरोनाच्या संकटात सातत्याने दुर्लक्षित ग्रामीण व शहरी पत्रकारांवर उपासमारीची वेळ

कोरोनाच्या संकटात सातत्याने दुर्लक्षित ग्रामीण व शहरी पत्रकारांवर उपासमारीची वेळ

588
समाज,सरकार,संपादक,माध्यमांकडून कित्येक पत्रकारांची साधी चौकशी नाही.
पत्रकारांनो तुमचे इथं कोण्ही नाही,तुम्ही मात्र सर्वांचे बरका?
(राम खुर्दळ यांजकडून आजच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य)
समाजाचा आरसा म्हणून पत्रकार सातत्याने सामाजिक मुद्याला आपल्या लेखणीतून,चित्रिकरणातून वाचा फोडीत असतो,यातील प्रमुख लोकांसाठी झटणारा,लोकांत वावरून बातमीसाठी उन्ह वाऱ्यात राबणारा(अधिस्वीकृत्ति नसलेला)पत्रकार मात्र कोरोनाच्या या महासंकटात गेल्या २ महिन्यापासून घरात बसलाय,घरातून बातम्या कव्हर करतोय,कित्येकांना बेड मिळवून देतो,मार्गदर्शन धीर देतोय,मात्र स्वतः खिश्यात दमडी नाही म्हणून घरात बोलणे खातोय,कित्येकांच्या घरात किराणा नाही,विजबिले थकली,दूधवाला,घरभाडे,घरातील रोजचा दैनंदिन खर्च भागवणे ही जिकिरीचे बनल्याने हातावर पोट असणारे महाराष्ट्र भरातील कित्येक पत्रकारांची आर्थिक स्थिती खालावली आहे,अनेकांची कौटुंबिक हालत गंभीर आहे,बाहेरच्या जगातील धडपड थांबल्याने कित्येकांच्या घरातील चुली पेटवन ही मोठ जिकीरीच होऊन बसल आहे.परिस्थिती गंभीर असली तरी सातत्याने ग्रामीन/शहरी बिटवर बातमीदारी करणाऱ्या पत्रकारांना कोरोनाच्या संकटात साधी विचारपूस ही कोणी करत नाही,जगला की मेला यांचेशी ही कोणाला घेणं देणं नाही,सरकारला तर अधिस्वीकृतीधारक सोडून कोणाशी घेणं देणं नाही,असे कित्येक वतनदारी असणाऱ्यांची चिंता आहे,मात्र कोरोना योद्धे असलेले,तळागाळात नगरांत,वस्तीत, गाव पाडे याठिकाणी अखंड पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार सर्वांचा वैरी असल्यागत समाज,सरकार,व संपादक,माध्यमे,लोकप्रतिनिधी,प्रशासन कोणी त्याला विचारायला तयार नाही,”उपाशी मरा किंवा अडचणीत झुरा”कोणी सामान्य पत्रकारांची कदर करणार नाही अशी वस्तुस्थिती आहे.
उन्ह पाऊस थंडीत रात्री बेरात्री बातमीचा शोध घेणारा जागता गावाचा,नगराचा पत्रकार घरची भाकर खाऊन समाजाचे मुद्दे व त्याला वाचा फोडण्यासाठी राबत असतो,ना मानधन ना पगार ,घरच्या कमाईतून राबणारे लाखो पत्रकार मोलमजुरी करून घर चालवतात व उरल्यासुरल्या पैशातून बातमीगिरी,त्यात कित्येकांना न्याय मिळवून देता मात्र स्वतःवरील अन्याय विसरलेला हा वेडा जगासाठी स्वतःला गमावतो मात्र प्रसंगात तो मात्र आपले सर्वस्व गमावत असतो,याच्याशी कोणाला घेणं देणं नसते,
माझे लेखन त्या घटकांना समर्पित आहे जे खरेखुरे पत्रकार आहेत,(काही पोटभरू)ज्यांना ओण समाजाचा आरसा यापेक्षा ते नेहमी पुढार्यांच्या,अधिकाऱ्यांचा आरसा बनून पत्रकारितेला स्वार्थची किनार असतात,अशी मंडळी यांच्या साठी हे लेखन अजिबात नाही त्यांनी वाचू ही नाही)
ज्यांनी खस्ता खाल्ल्या,वास्तव बातमीसाठी कित्येकांशी वैर घेतले, तडजोड केली नाही परखड वृत्ती जपली जोपासली,अश्यासाठी कित्येक माफिया, कित्येकजण अश्या प्रामाणिक तत्व निष्ठ पत्रकाराच्या जीवावर उठलेले असतात,असे कित्येक अनुभव मी 32 वर्षांच्या पत्रकारितेत स्वतः घेतले आहेत व कित्येकांचे जाणले सुद्धा,मात्र “घेतला वसा टाकणार नाही”म्हणून झटत आहोत,
सध्या कोरोनाचा काळ, जे दैनिक,वाहिन्या कोरोनाच्या महामारीत बातम्यांसाठी आग्रह धरतात,त्या माध्यमांचे संपादक तुम्हाला फोन तरी करतात का?तुम्ही कसे असा संदेश तरी पाठवता का?अहो तुमच्या माध्यमाना तुमची कदर नाही,तेव्हा समाज सरकारला कशी असेल?हा सवाल माझा त्या उद्धवस्त लाखो पत्रकारांना आहे की ज्यांनी आयुष्याची तीन पेक्षा अधिक दशके ग्रामीण भागासाठी खस्ता खात, घरखर्चातून,बिन मानधणातून पत्रकारितेत घालवली,अन स्वतः मातीत गेले, आता कित्येकजण भिकेला लागले आहेत,कोरोनाच्या काळात मात्र सर्वात ज्यास्त उपासमारीत असेन तर राज्यातील गरीब सामान्य ग्रामीण/शहरी पत्रकार ज्याचा वापर संघटना,आंदोलन, बातमीसाठी सगळे करतात,मात्र त्याला अडचणीत मातीत घालतात,अशी स्थिती सर्वत्र असल्याने “उठ पत्रकारां जागा हो,मरणाचा काळात शोषणकर्त्यांविरुद्ध लढा कर,टाक मोडून ही गुलामी,कधीतरी स्वाभिमानाने जगायला शिक…
आपला –
राम खुर्दळ,
राज्यउपाध्यक्ष-पत्रकार संरक्षण समिती , महाराष्ट्र राज्य 9423055801