Home मराठवाडा आमदार बबनराव लोणीकर यांना कोरोनाची लागण

आमदार बबनराव लोणीकर यांना कोरोनाची लागण

181
0

शुक्रवारी आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत परतूर आणि मंठा तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी शासनाकडे केली आहे.

जालना – लक्ष्मण बिलोरे

परतूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार तथा माजी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांना कोरोनाची लागण झाली आहे.शनिवारी सकाळी त्यांना कोरोना लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी डाॅक्टरचा सल्ला घेतला त्यामुळे ते पुढील उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल होणार असल्याचे समजते.विशेष म्हणजे शुक्रवारीच लोणीकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत परतूर मंठा येथे ५० खाटांचे कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी शासनाकडे केली होती.आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड टेस्ट करून घ्यावी असे त्यांनी कळविले आहे.