Home विदर्भ नागरीकांनी प्रशासनाला मदत करुन स्वतःची काळजी स्वतः घ्यावि

नागरीकांनी प्रशासनाला मदत करुन स्वतःची काळजी स्वतः घ्यावि

156
0

रवींद्र साखरे आर्वी

कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यासाठी पुढील पंधरा दिवस शिस्त पाळणे गरजेजे…..डॉ रिपल राणे

गेल्या वर्षभरापासून कोरोना सारख्या वैश्विक महामारीने संपूर्ण जगावर थैमान घातले आहेत. त्यात मध्यंतरीच्या काळात रुग्णसंख्या मंदावली असतांना आता अचानक मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहे.त्यात आता मृत्युदर देखील जास्त आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता नागरीकांनी स्वतःहून काही लक्षणे दिसताच समोर येउन कोरोना चाचणी करुन प्रशासनाला मदत करुन स्वतःच्या जीवाची देखील पर्वा करायला पाहिजे असे मत इंडियन मेडिकल असोसिएशनचे आर्वी अध्यक्ष, सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.रिपल राणे यांनी व्यक्त केले.
मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोरोना -२ या लाटीने अक्षरशः तांडव सुरु केले आहेत. रोजच अगदी जवळच्या लोकांच्या मृत्युच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बऱ्याच अंशी समाजामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कित्येक लोक असे सुद्धा आहेत की ज्यांना कोरोनाची लक्षणे जाणवून व डॉक्टरांनी सांगून सुद्धा ते कोरोना चाचणी करायला पुढे येत नाहीत.त्यामुळे धोका जास्त वाढत आहे.पुढे ते बाकिच्या लोकांच्या संपर्कात येतात आणि तेथून खऱ्या कोरोना साखळीचा जन्म होतो. त्यामुळे अशा लोकांनी पहिल्यांदा स्वतःहुन सामोरे येउन आपली व आपल्या कुटुंबाची चाचणी करुन घ्यायला पाहिजे.
दुसरे महत्त्वाचे म्हणजे कोरोना लसीकरण, बरेचसे लोक आजही लसीकरण करत नाही आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने जबाबदारीने ४५ वयाच्या वरील सर्व लोकांचे लसीकरण करुन घेण्यावर भर द्यावा. लसीकरणामुळे कुठल्याही प्रकारचा धोका होत नाही त्यामुळे लोकांनी आपल्या मनातील शंका दूर करुन स्वतः लस घेऊन इतरांना देखील प्रोत्साहीत करावे. सोबतच शासनाने “ब्रेक द चैन” अंतर्गत जी नियमावली घालून दिली आहेत त्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावेत.सोबतच जास्त संख्येने होणारे लग्न, तेरवी इत्यादी बाकी समारंभ टाळावेत किंवा शासनाच्या नियमाने करावे. कारण नसतांना कृपया कोणीही घराबाहेर पडू नये. बाहेर पडल्यानंतर पोलीसांशी हुज्जत घालू नका कारण ते देखील आपल्याच सुरक्षेसाठी रस्त्यावर उन्हातान्हात उभे आहेत.सर्व नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनचे आर्वीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.रिपल राणे यांनी व्यक्त केले.
डॉक्टर, शासन, प्रशासन व व्यापारीसुद्धा कोरोनाच्या लढाईमध्ये शर्थीचे प्रयत्न करुन लढत आहेत. त्यांना नागरीकांनी साथ देउन सकारात्मक विचाराने या महामारीतून आपल्याला वाचायचे आहे. नागरीकांनी प्रशासनाला मदत करुन स्वतःची काळजी स्वतःच घेऊन पुढील पंधरा दिवस तरी कडक शिस्त पाळणे गरजेजे आहे तरच आपण ही कोरोनाची दुसरी लाट थोपवुन लावू शकतो असे मत आमच्या…………… प्रतिनिधीशी बोलतांना इंडियन मेडिकल असोसिएशन आर्वीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.रिपल राणे यांनी व्यक्त केले.