Home विदर्भ कोरोना मुक्त तालूक्यासाठी घाटंजी तालूका प्रशासन प्रयत्नशील

कोरोना मुक्त तालूक्यासाठी घाटंजी तालूका प्रशासन प्रयत्नशील

115
0

यवतमाळ / घाटंजी – मागील वर्षापासून कोरोना विषाणू ने जग त्रस्त असतांना घाटंजी तालूक्यातील तालूका प्रशासन, स्वयंसेवी संस्था,पत्रकार तसेच तालूक्यातील सुज्ञ नागरीकांनी जनजागृती व महत्वाच्या योगदानामुळे घाटंजी तालूका बरेच दिवस कोरोना मुक्त ठेवण्यात यश मिळाले होते आज परत एकदा कोरोना संकटाचे थैमान सुर असतांना घाटंजी तालूका प्रशासन व जनतेच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणावर विविध उपक्रम राबविण्यात येत आहे यात घाटंजी शहरातील सर्व व्यावसायिक हे स्वत:हून कोरोना तपासणी करून आपल्या ग्राहकांना सुरक्षित सेवा देण्यास तत्परतेने पुढे सरसावत आहेत त्याच प्रमाने ग्रामिण‌ भागात ग्राम कोरोना नियंत्रण समित्या कार्यान्वित आहेत.

तालूक्यातील विविध स्वयंसेवी संस्था,प्रतिष्ठीत नागरीक यांनी तालूक्यातील नागरीकांना आनखी शक्य तितक्या प्रमाणात आपला परीवार व समाज सुरक्षित ठेण्याच्या दृष्टीने कोरोना तपासणी व ४५ वर्षावरील सर्व व्यक्तींनी लसीकरण करण्याकरीता तालूक्यात सुरू असलेल्या कोरोना तपासणी व लसीकरण शिबिरांत जावून तपासणी तसेच लसीकरण करण्याकरीता मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी व तालूका कोरोनामुक्त ठेवण्याकरीता सहकार्य करावे

“पुजा माटोडे”
तहसीलदार तथा अध्यक्ष तालूका‌ कोरोना नियंत्रण समिती, घाटंजी

घाटंजी तालूक्यात मागील काही दिवसांपासून तहसिल,नगर परिषद,आरोग्य विभाग,पोलीस,पंचायत समिती यांचे पथक संयुक्तरीत्या कार्यान्वित करण्यात आले असून पोलीस स्टेशन,बस स्टॅण्ड तसैच विविध ग्रामिण भागात नियमित कोरोना तपासणी शिबिरे या पथकांच्या माध्यमाने‌ घेण्यात येत आहे तसेच कोविड केअर सेंटर घाटंजी येथे देखिल या शिबीरां शिवाय नियमित नागरीकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. ग्रामिण रूग्नालय घाटंजी तसेच तालूक्यातील काही प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षे वयावरील सर्व नागरीकांना कोरोना लस उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोरोना लढाईत‌ प्रसिध्दी माध्यमेदेखील जनजागृती करीता महत्वाची भुमिका बजावत आहेत परंतू घाटंजी तालूक्याला कोरोनामुक्त ठेवायचे असल्याने तालूक्यात सदैव कार्यतत्पर असना-या सर्व स्वयंसेवी संस्था तसेच तालूक्यातील जेष्ठ व प्रतिष्ठित नागरिक यांनी स्वत:च्या परीने शक्य तितक्या मोठ्या‌ प्रमाणात कोरोना विरूध्दच्या लढाईत सहभागी होवून तालूका कोरोना मुक्तीच्या लढाईत सहकार्य करण्याचे आव्हान घाटंजी तालूका कोरोना नियंत्रण समिती द्वारे करण्यात येत आहे.तसेच सद्याचा कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता व मनुष्यासाठी जिवनच अतीआवश्यक असल्याने अतीमहत्वाच्या कामाशिवाय कुणीही घराबाहेर न पडता किंवा जिवनावश्यक बाबिंकरीता केवळ कुटूंबातील एकाच व्यक्तीने शक्य असल्यास फक्त एकदाच घराबाहेर पडावे व आपल्या परीवाराला व तालूक्याला कोरोना विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे व कोरोना विरूद्धच्या अफवा किंवा गैरसमजांवर विश्र्वास न ठेवण्याचे देखिल आवाहन समितीमार्फत करण्यात येत आहे.
तालूका कोरोना मुक्त ठेवण्याकरिता तहसिल , आरोग्य,नगर परिषद,पोलीस,पंचायत समिती इ. विभागातील अधिकारी, कर्मचारी यांचेबरोबर इतरही तालूका स्थरावरील सर्व विभाग कार्य करीत आहेत.