Home विदर्भ आर्णी पं.स.अंतर्गत आमदार निधी मधील सिमेंट रोड गेला चोरीला

आर्णी पं.स.अंतर्गत आमदार निधी मधील सिमेंट रोड गेला चोरीला

470
0

सर्वात पुढे महाराष्ट्र माझा

गेला रस्ता कुणीकडे?
ऐकावं ते नवलच
२६२७५२ रुपये हडपले

देवानंद जाधव

यवतमाळ –  आर्णि पंचायत समिती मध्ये शासनाची तिजोरी लुटण्याचे विविध प्रकार ऊघडकीस येत आहे. शासनाच्या तिजोरीला आपल्या बापाची खाजगी संपत्ती समजुन, कामे न करताही लाखो रुपये परस्पर हडपले जात आहे. त्यामुळे पं.सं ला किती
” भोक ” रे ? असा उद्विग्न आणि संतापजनक सवाल आर्णि तालुक्यातील जनता विचारत आहे.पंचायत समिती अंतर्गत चिकणी (क)गट ग्राम पंचायत मध्ये भंडारी (ज) गावाचा समावेश आहे. या गावाकरीता सन.२०१९~२०२०या वर्षात स्थानिक आमदार विकास निधी अंतर्गत सिमेंट रस्ता बांधकामासाठी रुपये २६२७५१ निधी मंजुर करण्यात आला. सदर रस्ता स्थानिक बाबाराव शिंदे यांचे घरापासून नारायण शंकर शिंदे ते महादेव प्लाॅट पर्यंत करायचा होता. माञ तत्कालीन लोकेशन नुसार सिमेंट रोड निर्माण नकरता संपुर्ण निधी संगनमताने हडपण्यात आला .असा आरोप ग्राम पंचायत सदस्य शिवाजी सिद्धु शिंदे आणि गोकुळ रघुनाथ शेगर यांनी तक्रार द्वारे केल्याने पं.सं.वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. सदर धक्कदायक प्रकार माहीतीच्या अधीकारात प्राप्त झालेल्या कागद पञावरुन ऊघड झाला आहे.


गट विकास अधिकारी यांना अंधारात ठेऊन अभियंता, ग्रामसेवक, ठेकेदार यांनी शासनाची फसवणुक केली असल्याची ग्रामस्थांची संतापजनक भावना आहे. आता पुन्हा एकदा ग्रामसेवकाने निर्लज्ज पणाचा कळस गाठत, कागदोपत्री झालेल्या आणि प्रत्यक्षात न झालेल्या रोडचे लोकेशन बदलवुन त्याच जागेवर सिमेंट रोड निर्माण करण्यासाठी दि.५|३|२०२१रोजी मासीक सभेत ठराव घेतला. त्या अर्थी बाबाराव शिंदे यांचे घरापासून नारायण शंकर शिंदे ते महादेव प्लाॅट हा सिमेंट रस्ता सन २०१९|२०२०मध्ये आमदार निधी मधुन झालाच नाही असे सिध्द होते. त्यामुळे पं.स.अधिकारी आणि कर्मचारी यांनी शासन आणि जनतेच्या डोळ्यात धुळफेक करुन, आणि कागदोपत्री सिमेंट रस्ता दाखुन, शासनाचा लाखो रुपयांच्या निधीची पुरती वाट लावली आहे. त्यामुळे लुटारुंच्या फौजेची कसुन चौकशी करुन दोषीवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी ग्रा.पं. सदस्य शिवाजी सिद्धु शिंदे आणि गोकुळ रघुनाथ शेगर यांनी निवेदनातुन केली आहे. आमदार निधी मधील सिमेंट रोड चोरीला गेल्याने, तालुक्यातील जनता, गेला रस्ता कुणीकडे?असा सवाल पंचायत समिती प्रशासनाला विचारत आहे. या संदर्भात दस्तुरखुद्द ग्राम पंचायत सदस्यानेच तक्रार केल्याने, भ्रष्टाचार करणा-यांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यात महाळुंगी ,ईचोरा, शेलु सेंदुरसनी सह तालुक्यात सर्वञ सर्वच गावात भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. कर्तव्य दक्ष जिल्हा धीकारी आणि आमदार संदीप धुर्वे यांनी या गंभीर प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन, शासनाची तिजोरी लुटण्याचे पाप करणा-यांना धडा शिकवावा अशी आर्णी तालुक्यातील जनतेची माफक अपेक्षा आहे. शेवटी आमदार निधी मधील सिमेंट रोड चोरीला गेल्याने, तालुक्यात ” सर्वात पुढे महाराष्ट्र माझा “
असे ऊपहासाने बोलले जात आहे. या प्रकरणात न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागण्याचा ईशारा तक्रारकर्ते यांनी दिल्याने, लुटारुंना तुर्तास घाम फुटला आहे.