Home महत्वाची बातमी रक्तदान करून वाहिली आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना आदरांजली

रक्तदान करून वाहिली आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना आदरांजली

195
0

रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद…30 रक्तदान दात्यांनी केले रक्तदान…

ईकबाल शेख

आर्वी ..भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्यां जयंतीनिमित्त सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 30 जणांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली… बुद्धविहार आंबेडकर वॉर्ड आर्वी येथे संपन्न झालेल्या या शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथील वैद्यकिय अधिकारी डॉ. मोहन सुटे यांचे हस्ते पार पडले….या औपचारिक उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष ऍड. दीपक सरदार होते तर प्रमुख अतिथी डॉ.भूषण होले, डॉ. अभिलाष धरमठोक, डॉ. पवन पाचोडे, डॉ. प्रा. प्रविण काळे मंचावर उपस्थित होते..
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक प्रकाश बनसोड सर यांनी केले..संचालन सुरेश भिवगडे यांनी तर आभार अजय वाघमारे यांनी मानले… या प्रसंगी रक्तदान दात्यांचा व या शिबिराला सहाय्य करणाऱ्या दानदात्यांचा प्रमुख पाहुण्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला… रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून या दानाने आपण दुसऱ्याचे प्राण वाचवून जीवनदान देत असतो असे प्रतिपादन डॉ. सुटे यांनी व्यक्त केले…डी.जे.ग्रुप आर्वी अध्यक्ष दर्पण टोकसे व राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आर्वी चे मुख्य समन्वयक प्रकाश बनसोड यांच्या पुढाकारातून व सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या शिबिरात रक्तदान दात्यांनी रक्तदान करून बाबासाहेबांना अभिवादन केले..
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रकाश बनसोड सर , प्रा. डॉ.प्रविण काळे सर ,दर्पण पंजाबराव टोकसे, सचिन कांबळे सर , नरेंद्र पखाले सर, प्रा. पंकज वाघमारे, शेखर पालेकर, प्रदीप मेंढे, सारंगधर पासरे, बंडू पाचोडे सर, दीपक ढोणे, विजय ढोणे, अजय वाघमारे, प्रविण अशोकराव काळे, सुरेंद्र भिवगडे, सुरज मेहरे, गौतम कुंभारे, संदीप सरोदे, पंकज भिमके, दीनेश सवाई, आकाश सवाई, दुसर्या हिरेखण, सचिन मनवर, सुरज मेहरे, प्रमोद घोडेस्वार, अभिषेक भिवगडे, कुणाल वानखेडे, संतोष पदोडे, गौतम पोहणे, सुरज गजभिये, अनिकेत बांबुडकर, प्रज्वल पाटील, प्रज्वल यावले, आनंद वंजारी, पवन जंगम, रवी गाडगे, अभिषेक भिवगडे ,आकाश सोदागर, रत्नदिप मोटघरे, मनोज घरडे,डाॅ.राहुल शेंडे सर व सर्व आंबेडकरी सामाजिक संघटनेच्या सभासदांनी सहकार्य केले..