Home विदर्भ सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कशी आली,,?एका निवेदनाचा हा दनका ,,,?

सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग कशी आली,,?एका निवेदनाचा हा दनका ,,,?

185

 बलवंत मनवर – पुसद‌

यवतमाळ – पुसद काळी दौलेत खान रस्त्याची अतिशय गंभीर स्वरूपाची दशा रोड खडुयात की खडुयात रोड हि अवस्था झाली होती,पंरतु महिलानी पुढाकार घेतल्यामुळे त्या ठिकाणचे काम आज रोजी मार्गी लागले आहेत, काळी,दौ जोडलेल्या T डांबरी रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाली होती.

असलेला डांबरी रस्ता पुर्णत: उखडल्यातच होता. त्यामुळे दळण वळणासाठी व वाहतूकीकरीता हीवरीच्या गावक-यांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता ही समस्या पाहून रस्ता त्वरित दुरूस्त करावा अशी मागणी जी.प. सार्वजनिक बांधकाम विभाग २ कडे निवेदन देऊन रस्त्या बाबत प्रशासनाचे लक्ष वेधले हिवरी वासींयाकरीता अत्यंत महत्त्वाचा असलेल्या या रस्त्याची दयनिय अवस्था पाहून उषा संतोष राऊत व सौ संध्या संदेश रणवीर या मायलेकीने गावाकरीता व गावक-याच्या सार्वजनिक हिताकरीता व गावाचे कुठलेही राजकीय पद नसतांना पाठपुरावा करून जि प बांधकाम विभाग २ ने आमदार निधीतुन सदर रस्त्याचे डांबरीपृष्ठ भागाचे नुतनीकरणाचे काम मंजूर केले व सदर रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू झाले आहे. सदर काम पाहण्याकरीता सौ संध्या संदेश रणवीर यांनी सकाळीच हिवरी येथे हजेरी लावून कामाची पाहणी केली. चांगल्या प्रकारे रस्ता बनावा ही असे त्या ठिकानी करणाऱ्या कामगाराकडून अपेक्षा व्यक्त केली.