Home जळगाव केल्याने होत आहे . .आधी केलेच पाहिजे.. चा प्रत्यय मुस्लिम मानियार बिरदारीचे...

केल्याने होत आहे . .आधी केलेच पाहिजे.. चा प्रत्यय मुस्लिम मानियार बिरदारीचे कोविड १५ बेड चे हॉस्पिटल फुल्ल

59
0

रावेर (शरीफ शेख)

केल्याने होत आहे आधी केलेच पाहिजे या उक्ती प्रमाणे मुस्लिम मानियार बिरादरी ने कोविड च्या दुसऱ्या लाटेत ही वैद्यकीय क्षेत्रात कार्याला सुरवात केली व ९ एप्रिल ला २५ खाटाचे कोविड ऑक्सिजन, आयसीयू,बाय पेप व जनरल वार्ड चे हॉस्पिटल ना नफा ना तोटा तत्वावर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत *ITI* सुरू केले व दुसऱ्याच दिवशी ऑक्सिजन व बाय पेप चे १५ खाटा भरून गेल्या. ही बाब अभिमानास्पद नसली तरी रुग्णांना दिलासा देणारी असल्याचे मत बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांनी व्यक्त केली

*शासन दरा पेक्षा ही कमी दर*

शासनाच्या दरा पेक्षाही कमी दरात म्हणजे बिना ऑक्सिजन बेड २०००/-रु. ऑक्सिजन +आयसीयू सहित फक्त ६०००/-
तर ऑक्सिजन+आयसीयू+बाय पेप ७५००/- मध्ये उपलब्ध करून देणारी महाराष्ट्रतील पहिली संस्था असून तसे रेट चार्ट खुल्या प्रमाणात रुग्ण नोंदणी ठिकाणी लावून पारदर्शकता जपलेली आहे।

*एच आर सी टी , रेमडेसिव्हर, व रक्त तपासणी सुध्दा कमी दरात उपलब्ध*
१७ मार्च पासून रेमडेसिव्हर १०५०/- रु व नंतर फक्त ७४९/- रु तसेच एच आर सी टी सर्व कोविड पॉझिटिव्ह व नॉन पॉझिटिव्ह यांच्यासाठी फक्त १८००/- रुपयांमध्ये तसेच कोविंड प्रोफाइल रक्त तपासणी सुद्धा फक्त १३००/- रुपयांमध्ये बिरादरी ने उपलब्ध करून दिलेली आहे त्यांच्या या तिन्ही तपासण्यांची अद्यापपावेतो शेकडो लोकांनी फायदा घेतलेला आहे.
*केल्याने होत आहेरे ….*

केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे या नुसार मुस्लिम मन्यार बिरादरीचे अध्यक्ष फारुक शेख यांनी सर्व सामाजिक संघटनाना आवाहन केलेले आहे की आजच्या या बिकट परिस्थितीत रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची होणारी पिळवणूक, त्यांच्या सोबत शारीरिक मानसिक व आर्थिक छळ थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन कोरोना विरुद्ध लढण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी स्वतः या रणांगणात उतरावेच लागेल.
*चांगले कार्यास समाज सदैव तयार*
अशा या मानवतावादि कार्यात आपणास मित्र, पत्रकार,समाज, दाते,काही डाक्टर, लॅब,मेडिकल स्टोर, व प्रशासन सहकार्य करीत असतो असा अनुभव मला मिळत आहे म्हणून नकारात्मक सूर न लावता या महामारी ला सयुक्त पणे लढा द्यावा असे आवाहन फारूक शेख यांनी केलेले आहे.