Home विदर्भ यवतमाळ जिल्हातील 12 मृत्युसह जिल्ह्यात 720 नव्याने पॉझेटिव्हसह‌ 668 जण कोरोनामुक्त

यवतमाळ जिल्हातील 12 मृत्युसह जिल्ह्यात 720 नव्याने पॉझेटिव्हसह‌ 668 जण कोरोनामुक्त

705
0

 

    यवतमाळ, दि. 11 : गत 24 तासात 12 मृत्युसह जिल्ह्यात 720 जण  नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 668 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

            जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 81 वर्षीय पुरुष व 61, 65, 80 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 56 व 60 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 85 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 53 व 73 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष आणि भंडारा शहरातील 54 महिलेचा समावेश आहे. तसेच रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 720 जणांमध्ये 451 पुरुष आणि 269 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 208 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 147, पांढरकवडा 82, वणी 69, दिग्रस 38, दारव्हा 30, कळंब 27, नेर 19, महागाव 18, आर्णि 18, घाटंजी 16, मारेगाव 16, झरीजामणी 14, उमरखेड 9, बाभुळगाव 5 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

            रविवारी एकूण 4002 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 720 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3286 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3185 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1891 तर गृह विलगीकरणात 1294 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34050 झाली आहे. 24 तासात 668 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 30119 आहे. तर जिल्ह्यात एकूण 746 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.93 असून मृत्युदर 2.19 आहे.

            सुरवातीपासून आतापर्यंत 311566 नमुने पाठविले असून यापैकी 309554 प्राप्त तर 2012 अप्राप्त आहेत. तसेच 275504 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.