Home विदर्भ अमरावती शहर कांग्रेस कमिटी तर्फे राजकमल चौक येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात...

अमरावती शहर कांग्रेस कमिटी तर्फे राजकमल चौक येथे केंद्रातील भाजप सरकार विरोधात निदर्शने.

48
0

मनिष गुडधे

अमरावती – सध्या संपूर्ण भारत व महाराष्ट्र मधे कोरोनाचा हाहाकार चालू असता या परिस्थिती मधे सुद्धा मोदी सरकार भाजपला राजकारण सुचते आहे. केंद्रातील मोदी मोदी सरकारने कोरोनाची लस पुरवठा न केल्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना लस सेंटर बंद पडलेले आहे. त्यामुळे जनता मृत्युमुखी पडत आहे. गुजरातमधिल लोकसंख्या महाराष्ट्राच्या तुलनेत अर्धी (कमी) असुन देखील त्यांना महाराष्ट्राच्या बरोबरीची लस देन्यात आलेली आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेबरोबर केंद्रातील मोदी सरकार हा भेदभाव अन्याय करत आहे याच्या निषेदार्थ आज अमरावती कांग्रेस कमिटीतर्फे अध्यक्ष बबलू भाऊ शेखावत व माजी महापौर विलास भाऊ इंगोले यांच्या नेतृत्वात राजकमल चौक येथे निदर्षने देण्यात आले.