Home परभणी जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती...

जगभरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या बद्दल दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती वर गुन्हा दाखल करा- AIMIM पालम

274
0

परभणी/प्रतीनीधी

उत्तर प्रदेश गाजियाबाद येथील रहिवासी नरसिंहानंद सरस्वती डासना देवी मंदिर गाजियाबाद येथील असुन त्यांनी दिनांक 02/04/2021 रोजी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला बाईट देताना आपत्तीजनक भाषेचा प्रयोग करून इस्लाम धर्मातील श्रद्धास्थान पैगंबर हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या बद्दल अपशब्द वापरून चुकीची माहिती मीडियाद्वारे प्रसारित करून जगभरातील इस्लाम धर्म मानणाऱ्या मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहे.त्यांचे हिंदू-मुस्लिम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कार्य कित्येक दिवसापासून सुरू आहे.व देशातील एकता व अखंडता तोडण्याचे काम करीत आहे.इस्लाम धर्माबद्दल षड्यंत्र रचून इस्लाम धर्माची छवी मलिन करण्याचे कट-कारस्थान कित्येक दिवसापासून रचत असल्याने पालम पोलीस स्टेशन येथे दिपक त्यागी उर्फ नरसिंहानंद सरस्वती वर कलम 124A,298,295,295A,व 34 भा.द.वि प्रमाणे व आयटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करून घ्यावा व देशभरात हिंदू-मुस्लीम धर्मीयांमध्ये तेढ निर्माण करून देशभरातील एकता व अखंडतेला घातक अशा बातम्या प्रसारित करणाऱ्या मीडियाला देखील प्रतिबंध करण्यात यावे अशी मागणी AIMIM पक्षाचे पालम शाखेच्या वतीने करण्यात आले या निवेदनावर AIMIM पक्षाचे पालम तालुका प्रभारी अध्यक्ष अनिस अब्दुल लतिफ खूरेशी,अॅड अजहरोद्दीन खतीब,हक्काणी खान पठाण,हाफेज आसेफ खुरेशी,सादात खान मंसुरखान पठाण,शेख बशीर वहाब,शफी खान रहेमत खान पठाण आदींचा स्वाक्षऱ्या आहेत.